Ajit Pawar: अजित पवारांच्या नावाचा स्टीकर सत्तारांनी काढला अन्..

उपमुख्यमंत्री अजित पवार हे डेंग्यू झाल्यापासून पहिल्यांदा आज कार्यक्रमाला हजेरी लावणार होते.
 Ajit Pawar
Ajit Pawarsakal

आज मंत्रालयात प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान २०२३ अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुखमंत्री अजित पवार हे सर्वजण उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. मंत्री महोदयासोबत शालेय विद्यार्थी प्रदूषण मुक्त साजरी करण्यासाठी शपथ घेणार आहेत.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे डेंग्यू झाल्यापासून पहिल्यांदा आज कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते कार्यक्रमस्थळी पोहोचले. मात्र, अजित पवार गैरहजर होते.

 Ajit Pawar
Pandharpur News: ना फडणवीस, ना अजित पवार, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही, मंदिर समितीच्या बैठकीत ठरला निर्णय

कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे आदी नेते उपस्थित आहेत, तर अजित पवार गैरहजर आहेत. कार्यक्रमाच्या स्टेजवर अजित पवारांचे नावाचे स्टिकर लावलेली खुर्ची ठेवण्यात आली होती. मात्र, ते आले नसल्याने खुर्चीचे स्टिकर अब्दुल सत्तार यांनी काढले, आणि त्या खुर्चीवर ते बसले.

डेंग्युची लागण झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

 Ajit Pawar
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुका तोंडावर राज्यात भाजप PM मोदींच्या नावाने राबवणार ११ कलमी कार्यक्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com