

Ajit Pawar Plane Crash rahul gandhi
esakal
Rohit Pawar: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारी २०२६ रोजी अपघात झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. पण तो अपघात होता की घातपात, याची चौकशी करण्याची मागणी अजितदादांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांनी केली. त्यासाठी त्यांनी मुंबई आणि बारामती पोलिसात जाऊन गुन्हा नोंदवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण, महाराष्ट्रातल्या या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलेला नाही. त्यामुळे रोहित पवारांनी एक वेगळा मार्ग निवडला. तो म्हणजे त्यांनी आपल्या राज्याशेजारील दुसऱ्या राज्यात म्हणजे कर्नाटकात बारामती अपघाताविषयी झिरो नंबरनं गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही आलं.