RajyaSabha Election : महाराष्ट्रातील सातही उमेदवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

देशभरातील राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला मतदान होणार होते, तर त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता निकाल जाहीर होणार होता.

मुंबई : राज्यातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.१८) केली.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अर्ज मागे घेण्याची बुधवार (ता.१८) शेवटची तारीख होती. सातही जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने उमेदवारांच्या विजयाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी होती.

- Coronavirus : रेल्वे, बस, मेट्रोबाबत असा आहे सरकारचा ‘५०-५० फॉर्म्युला’!

राज्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शरद पवार, फौजिया खान, कॉंग्रेसतर्फे राजीव सातव, भाजपतर्फे उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि भागवत कराड आणि शिवसेनेतर्फे प्रियांका चतुर्वेदी यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली आहे.

- Coronavirus : कोरोनाग्रस्त पेशंटना दिला जातोय 'हा' स्पेशल मेन्यू!

येत्या दोन एप्रिल रोजी राष्ट्रपती कार्यालयाकडून तशी अधिसूचना काढण्यात येणार आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची ३७ मते आवश्‍यक असतात त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे तीन उमेदवार सहज निवडून येतील, अशी परिस्थिती होती.

- Breaking : केंद्र सरकारचा आदेश; 'सीबीएसई आणि जेईई'च्या परीक्षा पुढे ढकलल्या!

देशभरातील राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला मतदान होणार होते, तर त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता निकाल जाहीर होणार होता. महाराष्ट्रातील सातही जागांचा यामध्ये समावेश होता. देशातील सतरा राज्यांतून ५५ सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All seven candidates from Maharashtra are elected unopposed in Rajya Sabha