सेनेने तेव्हांच आक्षेप घ्यायला हवा होता- अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर अमित शहा यांची प्रतिक्रीया...

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे. शिवसेनेनं तेव्हाच का आक्षेप घेतला नाही असा सवाल शाह यांनी केला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार हे मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यापासून म्हणत होतो. शिवसेनेने तेव्हाच आक्षेप घ्यायला हवा होता, तो घेतला नाही, असेही शहा म्हणाले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुख्यमंत्रिपदाबद्दल त्यावेळी काहीच न बोलणारे आता नव्या मागण्या घेऊन येत आहेत. मात्र त्या आम्हाला अमान्य आहेत, असं शहा म्हणाले. त्यामुळे युतीमध्ये निर्माण झालेली दरी आणखी रुंदावण्याची शक्यता आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी शिवसेनेकडून निवडणूक निकालानंतर करण्यात आली. यानंतर शिवसेना, भाजपामधील वाद विकोपाला गेला. मात्र तसं कोणतंही आश्वासन शिवसेनेला देण्यात आलं नव्हतं, असं स्पष्टीकरण अमित शहांनी दिलं आहे.

राष्ट्रवादीचे नऊ आमदार भाजपच्या संपर्कात; भाजप खासदाराचा दावा

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शहांनी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींसह देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अनेकदा मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा प्रचारसभांमध्ये उपस्थित केला. पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच असतील, असं मी आणि मोदींनी जाहीरपणे म्हटलं होतं. मुख्यमंत्रिपदावर आता दावा करणाऱ्यांनी त्यावेळी यावर कोणताही आक्षेप का घेतला नाही, असा सवाल शहांनी उपस्थित केला.

काबूलमध्ये स्फोट; सात ठार, दहा जखमी

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरून भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला सत्तास्थापना करण्यात अपयश आलं. त्यानंतर शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून आपल्या एकमेव मंत्र्याला राजीनामा द्यायला लावून शिवसेना आधीच भाजपपासून दूर झाली आहे. तसंच सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यास अपयश आलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit shah comment on Shivsena over chief ministerial demand