
शस्त्रक्रियेसाठी अनिल देशमुखांनी घेतली मुंबई न्यायालयात धाव
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) चार एप्रिल रोजी कारागृहात चालत असताना पडले होते. यामुळे त्यांच्या खांद्याला मार लागला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. हातावर शस्त्रक्रिया करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई न्यायालयात (Mumbai court) धाव घेतली आहे. देशमुख हे राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. (Anil Deshmukh rushed to Mumbai court for surgery)
मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यांची न्यायालयीन रवानगी करण्यात आली होती. त्यांच्या कोठडीत १३ मेपर्यंत वाढ केल्याने न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने आणखी १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मागील सुनावणीत अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत (CBI custody) वाढ करावी, अशी विनंती सीबीआयच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, विशेष सीबीआय कोर्टाने ही विनंती फेटाळली आणि देशमुख यांना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. आता पुन्हा एकदा न्यायालयाने ही कोठडी १४ दिवसांपर्यंत वाढवून १३ मे पर्यंत केली आहे.
हेही वाचा: मायलेकांसाठी ‘तो’ प्रवास ठरला शेवटचा; टिप्परने धडक दिल्याने मृत्यू
अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे जेलमधील बाथरूममध्ये घसरून पडले होते. तेव्हापासून ते रुग्णालयात आहेत. चालत असताना पडल्यामुळे त्यांचा खांदा डिसलोकेट झाला आहे. त्यांना दुखापत झाली असून, शस्त्रक्रिया (surgery) करण्यात येणार आहे. त्यांच्यावर कधी शस्त्रक्रिया येणार याची माहिती नाही. मात्र, तुरुंगात पडल्यानंतर जखमी झालेल्या हातावर शस्त्रक्रिया करण्यासाठी अनिल देशमुख यांनी मुंबई न्यायालयात (Mumbai court) धाव घेतली आहे.
Web Title: Anil Deshmukh Rushed To Mumbai Court For Surgery
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..