अरबी समुद्रातील चक्रीवादळांमध्ये वाढ का होतेय? 'हे' आहे कारण

अरबी समुद्रातील चक्रीवादळांमध्ये वाढ का होतेय? 'हे' आहे कारण चक्रीवादळाची वारंवारता कालावधी आणि तीव्रता वाढली आहे Arabian Sea experiencing more number of Cyclones these days than earlier Here is the Reason vjb 91
Signs of cyclone formation in Arabian sea
Signs of cyclone formation in Arabian sea

गेल्या काही काळात चक्रीवादळाची वारंवारता, कालावधी आणि तीव्रता वाढली आहे

मुंबई: अरबी समुद्रावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाची वारंवारता कालावधी आणि तीव्रता वाढली आहे; मात्र बंगालच्या उपसागरावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या वारंवारतेत किंचित घट झाली आहे. 2001 ते 2019 या कालावधीत अरबी समुद्रावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या वारंवारतेत 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच अतितीव्र वादळांचे प्रमाण 150 टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळांचे प्रमाण मात्र 8 टक्क्यांनी घटले असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासामध्ये हे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. (Arabian Sea experiencing more number of Cyclones these days than earlier Here is the Reason vjb 91)

स्प्रिंगर' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या 'चेजिंग स्टेटस ऑफ ट्रॉपिकल सायक्लॉन्स ओव्हर द नॉर्थ इंडियन ओशन' या शोधनिबंधात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील उष्णकटिबंधीय चक्रिवादळांचा वेध , कालावधी वारंवारता वितरण निर्मितीचे स्थान आणि 1982 ते 2019 या 38 वर्षांच्या कालावधीतील स्थिती या मापदंडाच्या आधारे घेण्यात आला आहे.

Signs of cyclone formation in Arabian sea
तौक्ते: पुढं काय?
esakal

पूर्वी अरबी समुद्रापेक्षाही बंगालच्या उपसागरावर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी समुद्र आणि वातावरणीय स्थिती अनुकूल असे. परंतु अलीकडे अरबी समुद्रावर चक्रीवादळासंबंधी विसंगत स्थिती निर्माण होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निर्दशनास आले असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. 2015 साली चपळ आणि मेघ ही अतितीव्र चक्रीवादळे एकाच महिन्यात लागोपाठ आली होती. 2018 साली आलेल्या 7 चक्रीवादळांपैकी 3 चक्रीवादळे अरबी समुद्रावर निर्माण झाली होती. 2019 साली निर्माण झालेल्या सर्वाधिक 8 चक्रीवादळांपैकी 5 चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली होती. 2020 साली आलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळामुळे इतिहासात प्रथमच महाराष्ट्राच्या किनारी भागात मुंबईजवळ जमीन खचल्याची घटना घडली. 2021 साली आलेले 'तौक्ते' चक्रीवादळ आतापर्यंतचे सर्वाधिक तीव्र वादळ असून याचा परिणाम देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्व 4 राज्यामध्ये दिसून आला.

Signs of cyclone formation in Arabian sea
"एवढं मोठं वादळ येणार माहीत असूनही असं घडणं दुर्दैवी"

"अरबी समुद्रावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचे प्रमाण वाढण्याचा थेट संबंध समुद्रपृष्ठाचे वाढते तापमान आण जागतिक तापमानवाढीमुळे वाढलेले आर्द्रतेचे प्रमाण यांच्याशी आहे असे पुण्याच्या आयआयटीएमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल म्हणाले. यामुळे चक्रीवादळाची केवळ संख्या वाढते आहे असे नाही तर अरबी समुद्रावरील चक्रीवादळांचे आकृतिबंध आणि स्वरूपही बदलते आहे. चक्रीवादळाच्या तीव्रतेसह त्याचा एकूण कालावधीही वाढला आहे" असे ही ते पुढे म्हणाले.

Signs of cyclone formation in Arabian sea
मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; काँग्रेसचे दोन जण 'डेंजर झोन'मध्ये?

चक्रीवादळांचे प्रमाण वाढले

प्रस्तुत अभ्यासानुसार 1982 ते 2000 या काळात 92 उष्णकटिबंधीय चक्रीवादळे निर्माण झाली. त्यापैकी 30 टक्के अतितीव्र होती. 2001 ते 2019 या काळात चक्रीवादळांची संख्या 100 पर्यंत पोहोचली. त्यापैकी 36 टक्के चक्रीवादळे अतितीव्र आहेत. अरबी समुद्रावरील चक्रीवादळांसाठी मे - जून हा पहिला तर ऑक्टोबर-नोव्हेंबर हा दुसरा मोक्याचा कालावधी ठरला. फेब्रुवारी आणि ऑगस्ट वगळता बंगालच्या उपसागरावर वर्षभराचा काळ चक्रीवादळांसाठी अनुकूल राहिला; मात्र एप्रिल-मे आणि नोव्हेंबर हा मोक्याचा कालावधी ठरला. गेल्या 2 दशकापासून अरबी समुद्रावरील चक्रीवादळांच्या एकूण कालावधीत 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच अतितीव्र चक्रीवादळांच्या कालावधीत 260 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळांच्या कालावधीत कोणताही महत्त्वाचा बदल जाणवला नाही.

Cyclone
Cyclone
Signs of cyclone formation in Arabian sea
पोर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरण: राज कुंद्राला 23 जुलै पर्यत कोठडी

असे होते मापदंड

अरबी समुद्रावरील चक्रीवादळांची तीव्रता 20 टक्के (मोसमी पावसानंतर) ते 40 टक्के (पूर्वमोसमी) पर्यंत वाढली आहे. समुद्रपृष्ठाचे तापमान, सापेक्ष आर्द्रता, मॉइस्ट स्टॅटिक एनर्जी, कमी प्रमाणातील भ्रमण, अल्पावधीत बदलणारा हवेचा वेग आणि दिशा, इत्यादी मापदंडांच्या आधारे चक्रीवादळाचे निर्मिती स्थान व तीव्रता यांचा अभ्यास करण्यात आला.

भारतासाठी धोक्याची घंटा

संपूर्ण अरबी समुद्राच्या तापमानवाढीचा परिणाम म्हणून भारताच्या किनारी भागात चक्रीवादळांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे यापूर्वीच्या काही अभ्यासातून समोर आले आहे. संपूर्ण अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात मोसमी पावसाच्या पूर्वी समुद्रपृष्ठाचे तापमान वाढलेले दिसत असले तरीही उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची उष्णता केवळ अरबी समुद्राच्या भारतीय किनाऱ्यालगत आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्व आणि मध्य भागात वाढत आहे, ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com