शपथविधीला अजितदादांचे नाव पुकारताच आशीष शेलार म्हणाले...

Ashish-Shelar
Ashish-Shelar

मुंबई - अगदी काल दुपारपर्यंत भाजपसोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे साथ सोडून गेल्यानंतर आज (बुधवार) आमदारकीच्या शपथविधीला हजर होते. शपथ घेण्यासाठी अजित पवार यांचे नाव घोषित होताच भाजप नेते आशीष शेलार त्यांना म्हणाले, या दादा या.

महाराष्ट्राच्या विधानसभेत आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीत आमदारांचा शपथविधी पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय आमदारांचे विधानभवनात स्वागत केले.

सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांच्या शपथविधीने आमदारांचा शपथविधी सुरु झाला. सकाळी आठ वाजता भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या शपथविधीने आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. ज्येष्ठतेनुसार विधानसभा सदस्यांनी शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, आशिष शेलार, गिरीश महाजन यांनी शपथ घेतली. यावेळी युवासेना नेते आदित्य ठाकरे हे सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या शेजारी पुढच्या बाकावर बसले होते. सभागृहात शपथविधीसाठी अजित पवारांचं नाव पुकारण्यात आले. त्यावेळी आशिष शेलार यांनी “या दादा या” असा आवाज दिला. मात्र अजित पवारांनी यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com