Sanjay Raut Slams Modi Govt Over India-Pakistan Asia Cup Match :esakal
महाराष्ट्र बातम्या
Sanjay Raut : पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणं म्हणजे देशद्रोहच! आशिया चषकातील सामन्यावरून राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात...
Sanjay Raut Slams Modi Govt Over India-Pakistan Asia Cup Match : संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना मोदी सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच तप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Sanjay Raut attacks Modi government for allowing India-Pakistan Asia Cup 2025 : आगामी आशिया चषक 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. भारत सरकारने या सामन्याला हिरवा कंदील दिल्याने हा सामना निश्चित झाला आहे. मात्र, या निर्णयावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.