esakal | कुणाल कामराच्या अडचणीत भर; खटला दाखल करण्यास ऍटर्नी जनरलची परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Kunal_Kamra

रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर काही वेळातच कुणाल कामरा यांनी ट्‌विट करून नाराजी व्यक्त केली होती.

कुणाल कामराच्या अडचणीत भर; खटला दाखल करण्यास ऍटर्नी जनरलची परवानगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सर्वोच्च न्यायालयासंदर्भात केलेल्या वादग्रस्त ट्‌विटमुळे स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कामराविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला चालविण्यास ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल परवानगी दिली आहे.

'जयंतराव, आधी फुकटात जे मिळालंय ते पचवा'; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर काही वेळातच कुणाल कामरा यांनी ट्‌विट करून नाराजी व्यक्त केली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयास सर्वोच्च जोकची उपमा देण्यात आली आहे. त्यामुळे या ट्‌विटबद्दल कामरा यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्‍टिस करणारे वकील अभिषेक रासकर आणि विधीचे विद्यार्थी श्रीरंग कातनेश्‍वरकर यांनी केली होती. तसे पत्र त्यांनी ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना पाठवले होते. ऍटर्नी जनरल यांनी त्या पत्राला उत्तर देत ऍड. रासकर यांनी केलेली मागणी मान्य करीत केली आणि खटला दाखल करण्यास परवानगी दिली आहे.

'भाजपने पुढील चार वर्षे स्वप्नच पाहत राहावे'; जयंत पाटील यांचा भाजपला टोला​

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अवमान कायद्याच्या आधीन :
लोकांना असे वाटते की, ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा आणि न्यायाधीशांचा त्यांना वाटणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे निषेध करू शकतात. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अवमान कायद्याच्या अधीन आहे. सर्वोच्च न्यायालयावर अनुचितपणे भाष्य करणाऱ्यांनी हे समजून घ्यायला हवे की, त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान कायदा 1972 नुसार कारवाई होऊ शकते, असा उल्लेख ऍटर्नी जनरल यांच्या संमती पत्रात करण्यात आला आहे.

'...तर महाविद्यालयांची मान्यता काढू'; रखडलेल्या प्राध्यापक भरतीवरून 'यूजीसी'चा इशारा!​

काय आहे प्रकरण?
इंटिरिअर डेकोरेटर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांचा बुधवारी (ता.11) सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. गोस्वामी यांना जामीन मिळाल्यानंतर कुणाल कामरा यांनी ट्‌विट करत सर्वोच्च न्यायालयावर नाराजी व्यक्त केली होती.

कामरा यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे. अभिव्यक्तीचे स्वतंत्र सर्वांना आहे. मात्र संविधान त्यावर काही बंधने घालते. न्यायपालिकेवर शिंतोडे उडविणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. ऍटर्नी जनरल यांनी कामरा यांच्याविरोधात अवमान याचिकेची कारवाई करण्यास परवानगी दिली आहे.
- अभिषेक रासकर, मुंबई उच्च न्यायालयातील वकील

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)