Atul Bhatkhalkar : हाच माज गांधी खानदानाला होता; भाजपचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र, बारामतीकर शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाही, असे पाटील म्हणाले होते.
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar Sakal

Atul Bhatkhalkar On Jayat Patil : बऱ्याच लोकांनी बारामतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र, बारामतीकर शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाही, असे विधान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदाप प्रत्युत्तर दिले असून, हाच माज गांधी खानदानाला अमेठीबाबत होता. मात्र, शेवटी त्यांना वायनाड शोधावे लागल्याचे सांगत तुम्हीदेखील एखादं वायनाड शोधून ठेवा असा खोचक सल्ला भातखळकर यांनी ट्वीट करत दिला आहे. भातखळकर यांच्या या प्रत्युत्तरामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता असून, जयंत पाटील भातखळकरांना काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भातखळकरांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय?

एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणार नाही असे जयंत पाटील म्हणाले होते. हाच माज गांधी खानदानाला अमेठीबाबत होता. शेवटी त्यांना वायनाड शोधावे लागलं. तुम्हीही शोधून ठेवा असे ट्वीट भातखळकर यांनी करत जयंत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.

Atul Bhatkhalkar
Raj Thackeray : भाजपच्या बालेकिल्ल्यातून 'मनसे' फुंकणार रणशिंग; आखणार नवी रणनीती

काय म्हणाले होते जयंत पाटील

पाटील म्हणाले होते की, यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये अनेकांनी खोदून पाहिलं मात्र पाणी लागलं नाही. त्यामुळे भाजपचा बारामतीमध्ये येऊन पवारांचा गढ काबीज करण्याचा जो प्रयत्न आहे त्यात त्यांना यश मिळणार नाही असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला होता. राज्याच्या पातळीवर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपाचे माजी मंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.

Atul Bhatkhalkar
Shivsena : ठाकरेंचा आणखी एक मावळा भाजपच्या गोटात; विदर्भात खिंडार

बारामतीसाठी भाजपनं कसली कंबर?

लोकसभेतील विजयसाठी देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील राज्यांमध्ये भाजपला यश मिळवण्यासाठी अशा मतदार संघांमध्ये जोरदार काम केले जाणार असून, यासाठी बारामतीमध्ये विजयी पतका फडकवण्यासाठी भाजपकडून आतापासूनच रणनीती आखण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

बारामतीवर विजय मिळवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून, येत्या 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान सीतारमण बारामती दौऱ्यावर येणार आहेत. बारामती विजयासाठी भाजपने 45 जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. यापूर्वी 2014आणि 2019 मध्ये भाजपाने बारामतीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात भाजपला यश मिळवता आले नाही. त्यामुळे आता अमेठी पॅटर्नचा वापर करून भाजप 2024 मध्ये पवारांच्या बारामतीत विजयी पताका फडकवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com