
दाऊद आणि भाजपा म्हणजे “येह रिश्ता क्या कहलाता है”
मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) पथकाने आज मुंबईमध्ये चार ठिकाणी छापे टाकले आहेत. दाऊदशी संबंधित असलेल्या जवळपास २९ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्यामध्ये माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणी यांच्या मालमत्तेवरही छापे टाकले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सुहेल खंडवाणी आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो पोस्ट केला आहे.
(BJP Dawood Ibrahim And Devendra Fadanavis Relation)
आज एनआयए ने मुंबईत छापेमारी केली आहे. माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणी, बाबा फालुदाचे मालक अस्लम सोरटिया यांच्यासह २० जणांच्या मालमत्तेवर छापेमारी करण्यात आली आहे. माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणी यांच्या सोबतचा देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो अतुल लोंढे यांनी शेअर केला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये फडणवीस आणि खंडवाणी एकत्र जेवताना आणि भेटताना दिसत आहेत.
ट्वीट करताना अतुल लोंढे यांनी म्हटलंय की, दाऊदशी संबंधीत म्हणून ज्याच्यावर आज NIA ने रेड टाकल्याच्या बातम्या दाखवल्या जात आहेत तो हा सुहेल खंडवानी. दाऊद आणि भाजपा म्हणजे “येह रिश्ता क्या कहलाता है” असं ट्वीट करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: पाकिस्तान ते तेलंगाणा via पंजाब; दहशतवाद्यांच्या तस्करी कारवाया सुरूच
दरम्यान आज दिवसभरात एनआयए या संस्थेने कुख्यात डॉन दाऊदशी संबंध असलेल्या मुंबईतील २९ जणांच्या मालमत्तेवर छापेमारी केली असून काहींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान दाऊदशी संबंध असलेल्या प्रकरणाची तपासणी करण्याची जबाबदारी गृहमंत्रालयाने फेब्रुवारीमध्ये NIA कडे दिली होती. NIA राष्ट्रीय तपास यंत्रणा ही दहशतवादासंबंधी तपास करणारी देशातली सर्वात मोठी यंत्रणा आहे.
हेही वाचा: 'बलात्कार केला, व्हिडीओ काढले, गोळ्या खायला लावल्या'; मंत्र्याच्या मुलावर गुन्हा
परंतु कॉंग्रेसचे अतुल लोंढे यांनी ट्वीट करत भाजपा आणि डॉन दाऊदचे संबंध असल्याचं दाखवून दिलंय. तसेच आज सुहेल खंडवाणी यांचा दाऊदशी संबंध असल्याच्या कारणावरुन त्यांच्या मालमत्तेवर छापा टाकण्यात आला आहे तोच खंडवाणी फडणवीस यांच्यासोबत जेवण करतानाचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
Web Title: Atul Londhe Dawood Ibrahim Devendra Fadanavis Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..