९५ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड | Marathi Sahitya Sammelan And Bharat Sasane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Sasane
९५ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

९५ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

उदगीर (जि.लातूर) : या वर्षात होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे (Bharat Sasane) यांची घोषणा करण्यात आली आहे. २०२२ या वर्षामध्ये होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) नियोजनाला नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुरुवात झाली. आज रविवारी (ता.दोन) लातूर (Latur) जिल्ह्यातील उदगीर (Udgir) येथील महाराष्ट्र उदयगिरी महायिद्यालयात अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये साहित्य महामंडळाच्या सर्व सदस्याच्या उपस्थितीत साहित्यिक प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची निवड करण्यात आल्याची व २२, २३ व २३ एप्रिलला हे साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील (Kautikrao Thale Patil) यांनी केली. (Author Bharat Sasane Appointed As President Of 95 Marathi Sahitya Sammelan In Udgir Of Latur)

हेही वाचा: जालना-खामगाव रेल्वेसाठी साडेतीन कोटींचा निधी : रावसाहेब दानवे

या बैठकीला साहित्य महामंडळाचे कार्यवाहक डॉ दादा गोरे, उपाध्यक्ष कपूर वासनिक, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, सदस्य प्रा मिलिंद जोशी, विलास मानेकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, संस्थेचे उपाध्यक्ष तथा मसापचे शाखा अध्यक्ष श्री तिरुके, रमेश अंबरखाने, दिनेश सास्तुरकर, प्राचार्य आर.आर.तांबोळी, उपप्राचार्य प्रा.डॉ. राजकुमार मस्के यांची उपस्थिती होती.अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने २०२२ या वर्षात घेण्यात येणारे ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजनाला आताच सुरू करण्यात आले आहे. या वर्षीचे संमेलन हे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार आहे.

हेही वाचा: उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणावा, अजित पवारांचा राणेंना सल्ला

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र उदयागिरी महाविद्यालयाने संमेलन घेण्याची तयारी सुरू केलीय. आज उदगीरमध्ये साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली आहे. उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार यावर सध्या चर्चा सुरू होती. त्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट, डॉ. रामचंद्र देखणे, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे, प्रवीण दवणे, अच्युत गोडबोले यांच्या नावाची चर्चा होती. सध्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यालय हे मराठवाड्यातल औरंगाबादेत आहे. या उदगीरच्या बैठकीत साहित्य संमेलन अध्यक्षाची निवड घोषित करण्यात आली. शिवाय साहित्य संमेलनाच्या कोरोना काळातील आयोजनाबाबत सखोल चर्चा केली गेली. हे साहित्य संमेलन २२,२३ व २४ एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathi Sahitya Sammelan
loading image
go to top