CM एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला जामीन

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.
CM eknath shinde
CM eknath shindeEsakal

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. राजेश मारुती आगवणे असं आरोपीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी राजेश आगवणे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. (Bail to accused who threatened CM Eknath Shinde pune )

सोमवारी रात्री ११२ या क्रमांकावर फोन करून मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यावेळी धमकी देणाऱ्याने मी एकनाथ शिंदे यांनी उडवणार आहे असं म्हटलं आणि कॉल कट केला. पुण्यातील वारजे परिसरातून हा कॉल करण्यात आला होता.

What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

याप्रकरणी पोलिसांनी राजेश आगवणे याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार त्याला जामीन मंजूर झाला आहे.

CM eknath shinde
Atique Ahmed: गँगस्टर अतिक अहमद अन् त्याच्या भावावर कोणी झाडल्या गोळ्या? नावं आली समोर

आगवणे दारूच्या नशेत आधी ॲम्बुलन्सला फोन केला. त्यानंतर ११२ वर फोन केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

तो धारावी, मुंबईत वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असे त्याची पत्नी व ओळखीचे लोकांनी त्याच्यासंदर्भात माहिती सांगितली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com