
मुंबई क्राइम ब्रँचने शहरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई सुरू केलीय. पोलीस तपासत आता मोठा खुलासा झालाय. यात बांगलादेशींना अवैधरित्या भारतात आणण्याचं रेट कार्डच समोर आलंय. कोणत्या मार्गाने भारतात आणायचं यानुसार वेगवेगळे दर ठरलेले आहेत. राज्यभरात एटीएस, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई क्राइम ब्रँचने बांगलादेशींवर कारवाई केलीय. घाटकोप पोलिसांनी अवैधरित्या राहणाऱ्या १३ बांगलादेशींना अटक केली. रविवारी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचकडून ७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय.