Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

बीडमध्ये रविवारी नारायण गडाच्या फिरत्या नारळी सप्ताहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र दोघांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं. त्यामुळे परिस्थिती निवळली आहे.
Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

Loksabha election 2024 : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

बीड जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेल्या नारायणगडाच्या फिरत्या नारळी सप्ताहामध्ये सिरसमार्ग येथे मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली. नेमक्या याचवेळी पंकजा मुंडे ह्यादेखील सप्ताहामध्ये दाखल झाल्या. दोघांच्या उपस्थितीने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते गोंधळ घालू लागले. त्याचं कारण पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं विधान.

पंकजा यांनी काही दिवसांपूर्वी, उपोषण करुन आरक्षण मिळत नसतं असं विधान केलं होतं. परंतु नंतर त्यांनी असं विधानच केलं नसल्याची कबुली दिली होती. मात्र सध्या त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यावर मराठा समाजाची नाराजी दिसून येत आहे.

रविवारी नारायण गडाच्या फिरत्या नारळी सप्ताहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र दोघांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं. त्यामुळे परिस्थिती निवळली.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?
Maharashtra Din 2024 : जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे, यंदाच्या सुट्टीत नक्की द्या भेट

दरम्यान, बीडमध्ये सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरु आहे. कुणाचं पारड जड हे सांगणं अवघड आहे. परंतु मराठा समाजामध्ये भाजपवर असलेली नाराजी मतांमधून दिसून येते का, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. मनोज जरांगे यांनी कुणालाही पाठिंबा दिलेला नसून शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?
VIDEO: बाप तसा लेक! गोविंदाच्या मुलाच्या जबरदस्त डान्स व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

दुसरीकडे स्व. विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं बोललं जात होतं. प्रत्याक्षात त्यांनी बीडमधून माघार घेतली. मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आपण माघार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्याच्या बाबतीत शिवसंग्रामने तटस्थतेची भूमिका घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com