
'लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप बहुमतात येणार आहे.'
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप बहुमतात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही निवणुकीबाबत लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.
2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) शिंदे गट आणि भाजपला 200 हून अधिक जागा कशा मिळतील यावर आमचा विचार सुरु आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्ही युती करुन लढणार आहोत, असं काल देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. आमच्या सरकारचं काम पाहिलं तर जे निर्णय महाविकास आघाडीनं घेतले नाहीत, ते आम्ही घेतले आहेत, असं देसाई म्हणाले.
मी आता नागपूरला चाललो आहे. आज माझी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेट होणार आहे. महाराष्ट्रात 48 जागा लोकसभेच्या आहेत. शिंदे-फडणवीसांनी सांगितलंय की, आम्ही दोघंही एकत्र बसून निवडणूक लढवू, त्यामुळं माध्यमांनी याला वेगळं वळण देऊ नये. बावनकुळे माझे चांगले मित्र आहेत, असंही त्यांनी आवर्जुन सांगितलं.
साडेतीन महिने अज्ञातवासात संजय राऊत (Sanjay Raut) होते, त्यांना पुस्तक देण्याची मुभा होती. ज्योतिष शास्त्राची पुस्तक वाचून त्यांना ते ज्ञान आलंय. त्यामुळं त्यांनी फेब्रुवारीबद्दल जे स्वप्न बघितलंय ते बघत राहावं. राऊत दीड महिन्यांनी खुल्या वातावरणात आले आहेत. ते अंधारात तीर सोडत असतात, असा टोलाही देसाईंनी लगावला. अधिवेशन झाल्यावर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करू आणि बेळगावमध्ये कधी जायचं हे ठरवू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.