विधानसभा अध्यक्ष निवडीत रंगत; भाजपनेही दिला उमेदवार

टीम ई-सकाळ
Saturday, 30 November 2019

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची उद्या निवड होणार आहे. तत्पूर्वी, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांसाठी व्हिप काढला आहे. यासगळ्या घडामोडींमध्ये भाजपने विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत उडी घेतली आहे. भाजपने 105 आणि 18 अपक्ष आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला आहे. त्यांनी या जोरावर विधानसभा अध्यक्ष निवडीत काँग्रेसला आव्हान दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊन लोड करा ई-सकाळचे एप

किसन कथोरेंच्या नावाची घोषणा
आज, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयांवर ताशेरे ओढले. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'सत्तेवर आल्यानंतर लगेचच सरकारने आपला मनमानी कारभार सुरू केला आहे. पण, आम्ही त्यांना नियमाबाहेर कारभार करू देणार नाही. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी अर्ज भरायला दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत होती. त्याचवेळी आम्ही मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. कथोरे हे जवळपास एक लाख 74 हजार मतांनी निवडून आले आहेत. आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.'

आणखी वाचा - बहुमत चाचणीपूर्वी संजय राऊत यांचं ट्विट 

आणखी वाचा - अजित पवार भेटले भाजप नेत्याला, म्हणतात, 'राजकीय चर्चा नाही'

आणखी वाचा - विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोलेंचे नाव

काय म्हणाले चंद्रकात पाटील?

  • सरकारकडे बहुमत आहे तर, आमदारांना कोंडून का ठेवले?
  • सरकारने सत्तेवर येताच कायदे तोडण्यास सुरुवात केली 
  • आम्ही प्रबळ विरोधीपक्ष म्हणून काम करू 
  • मारून मुटकून सरकार फार दिवस चालवता येत नाही
  • शिवाजी पार्कवरील शपथविधी बेकायदेशीर
     
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp announcement of kisan kathore for assembly speaker election