'किरण मानेचे बोलवते धनी कोण?' चित्रा वाघ यांचा सवाल

कोण आहेत मानेचे बोलवते धनी ? या सोंगाड्यावर कारवाई करा - चित्रा वाघ
Chitra Wagh Statement on Kiran Mane
Chitra Wagh Statement on Kiran Maneesakal

मुलगी झाली हो या मालिकेतून अभिनेता किरण मानेंना (Kiran Mane) काढून टाकलं आहे. यानंतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांकडून यावर टीका केली जातं आहे. दरम्यान, आता यात राजकीय (Political Leaders) नेत्यांनीही उडी घेतील असून सत्ताधारी आणि विरोधकांतील काही नेतेमंडळी एकमेकांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान आता भाजपाच्या (BJP Chitra vagh) चित्रा वाघ यांनी किरण माने यांना सत्ताधारी पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. (Chitra Wagh Statement on Kiran Mane)

यात त्या म्हणतात, मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणाऱ्या किरण मानेला प्रोडक्शन हाउसनं (Production house) हाकलून दिलय आहे. मग मानेनं (Kiran Mane) नवं नाट्य उभं केलं. महिलांचा विनयभंग व पंतप्रधानांवर (PM Modi) विखारी टीका करणा-या किरण माने यांना सत्ताधारी पाठीशी घालत आहेत, आरोप भाजपाच्या चित्रा वाघ यांना केला आहे. कोण आहेत मानेचे बोलवते धनी ? या सोंगाड्यावर कारवाई करा. त्यांना शिक्षा झालीचं पाहीजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Chitra Wagh Statement on Kiran Mane
देशात सक्रिय रुग्णसंख्या 16 लाखांच्या पार, पॉझिटिव्हिटी रेट वाढला

अभिनेता किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यात किरण माने यांना महिला सहकलाकारांशी गैरवर्तन केल्यानं काढून टाकल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याआधी दिग्दर्शकांसह टीमनेही किरण माने यांना तीन वेळा समज दिल्याचं आणि तरीही वर्तन न सुधारल्यानं काढल्याचं सांगितलं होतं. शिवाय मालिकेतील कलाकार सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनीही ते टोमणे मारतात आणि वागणं चांगलं नव्हतं असं म्हटलं होतं. आता यावर किरण मानेंच्या बाजुने इतर सहकलाकार एकवटले आहेत. त्यांनी स्पष्टपणे किरण माने हे एक चांगले कलाकार आहेत आणि त्यांचे सेटवरचे वर्तनही चांगले असल्याचं म्हटलं आहे.

Chitra Wagh Statement on Kiran Mane
गंगेत वाहणारे मृतदेह तुम्हाला मतं देणार का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com