'इतिहास सांगतो आमुचा स्त्रीने..' चित्रा वाघ यांनी दिला औरंगजेबाचा दाखला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

'इतिहास सांगतो आमुचा स्त्रीने..' चित्रा वाघ यांनी दिला औरंगजेबाचा दाखला!

महिलासंबंधीत प्रश्नावर भाजप नेत्या चित्रा वाघ सातत्याने आवाज उठवत असतात. अशातच त्यांनी आज महिलांचा सन्मान व्हायलाचं हवा, अशा आशयाचे ट्वीट केले. कुणीही मातृशक्तीचा अपमान होईल अशी वक्तव्य करू नयेत. असेही त्या म्हणाल्या

हेही वाचा: धक्कादायक! जन्मदात्या बापाने तीन महिन्याच्या मुलीला 70 हजारांना विकले

चित्रा वाघ ट्वीट करत म्हणाल्या," राणी लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला.. जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला.. महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला… इतिहास सांगतो आमुचा स्त्रीने शत्रू तुडवला.. महिलांचा सन्मान व्हायलाचं हवा.. कुणीही मातृशक्तीचा अपमान होईल अशी वक्तव्य करू नयेत .."

राज्याच्या राजकारणात महिलांबाबत अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली जातात. यावरुनच चित्रा वाघ यांनी ट्वीट करत महिलांचा सन्मान करा, असा निशाणा साधलाय.

Web Title: Bjp Leader Chitra Wagh Appeal To Respect Women In Society

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..