पंकजा मुंडेच्या भेटीनंतर एकनाथ खडसे म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

भाजपनेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चांनंतर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची आज (ता. ०४) भेट घेतली. या भेटीनंतर ही भेट ही पारिवारिक भेट असल्याचे त्यांनी सांगितले. पंकजाताई आणि रोहिणी खडसेंचा पराभवाची कारणे काय आहेत यावरही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई : भाजपनेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चांनंतर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची आज (ता. ०४) भेट घेतली. या भेटीनंतर ही भेट ही पारिवारिक भेट असल्याचे त्यांनी सांगितले. पंकजाताई आणि रोहिणी खडसेंचा पराभवाची कारणे काय आहेत यावरही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

कौर्याची परिसीमा; अर्धवट जळलेला महिलेचा मृतदेह सापडला

तसेच, आगामी काळात ज्या कारणांसाठी पराभव झाला ती कारणे वरिष्ठांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि वरिष्ठांनी याची नोंद घेऊन पक्षाविरोधी कारवाई करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशा स्वरूपाची ही चर्चा होती. आमच्यात कोणी नाराज नसल्याचेही खडसेंनी यावेळी सांगितले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाविरोधी कामे करणारांची नावे दिली असून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असेही खडसे यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मध्यस्थाची गरज नाही अनेकांमध्ये अस्वस्थता आहे ते, मी सांगितलं माझा आणि पंकजाचे एकच मत असल्याचेही त्यांनी सांगितले. दुर्दैवाने हे चित्र खरं आहे की ओबीसी बहुजन नेते आहेत ते त्या ठिकाणी निवडणुकीत हरले. पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांचा पराभव झाला तर बावनकुळे, तावडे, प्रकाश महेता अशा नेत्यांना तिकीट नाकारले तर काही ठिकाणी पाडण्यासाठीही प्रयत्न झाला.

काश्‍मीरमध्ये हिमस्खलन; चार जवान मृत्युमुखी

निवडणूक व्यवस्थित लढवली गेली असती तर भाजपच्या १०५ पेक्षा अधिक जागा निवडून आल्या असत्या. महायुतीला जनतेने मतदान केलं होतं प्रमुख दोन घटक म्हणजे भाजप आणि सेना दोघांच्याही ठिकाणी समन्वय व्यवस्थित झाला असता दोन पावलं मागे गेले असते तर महायुतीचाच मुख्यमंत्री झाला असता. सेनेची एखादी मागणी मान्य केली असती तरी मार्ग निघाला असता, माझा रोख मुख्यमंत्र्यांवर असण्यापेक्षा जो प्रमुख आहे त्याच्यावर असल्याचेही खडसे यांनी सांगितले.

काय घडलं बैठकीत ज्यानंतर अजित पवारांनी केलं बंड

पक्ष कधीच यासंदर्भात दोषी नसतो नेतृत्व भागीदार होतं तर अपयशातही भागीदार व्हायला हवं, पक्ष म्हणून नाही तर ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पराभव मान्य करायला हवा. आज विरोधी पक्षनेता फडणवीस झालेत त्यांचे आणि उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्यांचेही खडसेंनी अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Eknath Khadase Speak After Meet Pankaja Munde