Narayan Rane : नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली?

कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र २००५ साली त्यांनी शिवसेना सोडली
Narayan Rane birthday
Narayan Rane birthdaysakal

Narayan Rane Birthday : आज नारायण राणे यांचा वाढदिवस. आज ते ७३ वर्षाचे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांपैकी ते एक आहेत. ते आपल्या रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत येत असतात. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आपले पहिले पाऊल टाकले.

कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती मात्र २००५ साली त्यांनी शिवसेना सोडली पण तुम्हाला माहिती आहे का नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (why Narayan Rane left shiv sena )

शिवसेनेत असताना त्यांचा राजकारणाचा ग्राफ चढत्या क्रमावरच होता. 1985 साली ते मुंबई महानगरापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1990 ला ते कणकवली-मालवण मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांनी काही प्रमुख खाते सांभाळली.

पुढे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा तेव्हा शिवसेनेची धुरा त्यांच्याकडे सोपवत 1998 ते 99 या काळात त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. मात्र अचानक 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. असं काय झालं की राणेंना अचानक शिवसेना सोडावी लागली?

Narayan Rane birthday
Raj Thackeray : पाडवा मेळाव्यातील टीकेनंतर एकनाथ शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी दाखल

या वर्षी गुढीपाडव्या निमित्त शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी नारायण राणे यांनी शिवसेना का सोडली, यासंदर्भातील एक किस्सा सांगितला.

राज ठाकरे यांनी म्हणाले होते, "नारायण राणे हे पक्ष सोडून गेलेच नसते. त्यांच्यासोबत काय झालं ते मी तुम्हाला सांगतो, जेव्हा नारायण राणेंनी सर्व ठरवलं तेव्हा मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की नारायण राव काय करताय. म्हटलं, मी साहेबांशी बोलतो तुम्ही जाऊ नका. नारायण राणे म्हणाले, तुम्ही बोला साहेबांशी."

पुढे राज ठाकरे सांगतात," मी लगेच बाळासाहेबांना फोन केला, मी सांगितलं राणेंची इच्छा नाहीये, त्यांना जाऊ देऊ नका. तेव्हा बाळासाहेब मला म्हणाले त्यांना लगेच घरी घेऊन ये. मी विचारलं नक्की ना, तर म्हणाले हो नक्का, घेऊन ये घरी. मी नारायण राणेंना फोन केला, म्हटलं लगेच इथे या आपल्याला साहेबांकडे जायचंय. राणे म्हणाले निघालोच. ते तिथून निघाले पण मला पाच मिनिटांत बाळासाहेबांचा पुन्हा फोन आला. म्हणाले, अरे, त्याला नको बोलवू. मला कोणीतरी मागे बोलतंय असं जाणवलं. मग काय मी राणेंना सांगितलं फोन करुन येऊ नका",

Narayan Rane birthday
Narayan Rane : उद्धव ठाकरे महाफडतूस, कार्यशून्य; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून टीकास्त्र

अशा प्रकारे राज ठाकरे यांनी थेट अप्रत्यक्षपण उद्धव ठाकरेंमुळे नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. असे सांगितले. 2005 साली नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. पण तिथेही ते फार काळ टिकले नाही 2018 मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यांनी स्वत:चा  'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष'  काढला पुढे 2019 मध्ये त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भाजपमध्ये विलीन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com