

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीत स्थान देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सविस्तर भूमिका मांडणारं पत्र लिहिलं आहे. पण यावरुन भाजपनं शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर तिरकसपणे निशाणा साधला आहे. (BJP targets Uddhav Thackeray from Devendra Fadnavis over write a letter to Ajit Pawar on Nawab Malik)
उद्धव ठाकरेंवर निशाणा
फडणवीसांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन अजितदादांना लिहिलेलं पत्र पोस्ट केल्यानंतर काही वेळातच महाराष्ट्र भाजपनं आपल्या ट्विटर हँडलवर फडणवीसांचं हे ट्विट शेअर करत त्यातून तिरकसपणे थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. या पोस्टमध्ये भाजपनं म्हटलं की, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…याची जाणीव आम्हाला होती आहे आणि कायम राहणार. सत्तेसाठी विचारधारा बदणारे आणि लाचारी पत्करणारे आम्ही नाही, हे ट्विट भाजपनं थेट उद्धव ठाकरेंना टॅग केलं. (Marathi Tajya Batmya)
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
दरम्यान, मलिकांना सोबत घेऊ नका अशा आशयाचं पत्र फडणवीसांनी अजित पवारांना लिहिल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना काही सवाल करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांनी म्हटलं की, "नवाब मलिक यांच्या अजितदादांसोबत येण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजिदादांना एक पत्र लिहिलं आहे. (Latest Marathi News)
यामध्ये अशा पद्धतीनं त्यांना महायुतीत सामावून घेऊ नये असं म्हटलं आहे. सगळाच गमतीदार भाग आहे. ज्यापद्धतीनं फडणवीस ट्रोल झाले आहेत, त्यानंतर त्यांना ही उपरती झालेली आहे. आपल्या पत्रात फडणवीसांनी सत्तेपेक्षा देश मोठा असं म्हटलं आहे. पण फडणवीसांना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे की, सत्तेपेक्षा देश मोठा म्हणता तेव्हा आत्तापर्यंत ज्या लोकांवर भाजपनं आरोप केले त्यांना सत्तेत घेताना त्यांचा विवेकवाद कुठे गेला होता?
तेव्हा तत्वज्ञान कुठे गेलं होतं?
सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या अजितदादांना आपण पत्र लिहित आहात त्यांना मोदींनी महाराष्ट्रात येऊन ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता. इतका मोठा आरोप केल्यानंतरही त्यांना सत्तेत सामावून घेणं हे तुमच्या नैतिकतेत बसत होतं का? त्यावेळी सत्तेपेक्षा देश मोठा हे तत्वज्ञान का सुचलं नाही. अजितदादांना सत्तेत सामावून घेणं चुकीचं आहे, असं सांगणारं पत्र भाजपच्या कुठल्या नेत्यांना लिहाल एवढाच आमचा प्रश्न आहे," अशा शब्दांत अंधारेंनी फडणवीसांना अनेक सवाल विचारले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.