Vidhan Sabha 2019 : राम कदम, मेहता यांच्यासह 'या' आमदारांना भाजप देणार डच्चू?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप काही विद्यमान आमदारांना डच्चू देण्याच्या मार्गावर आहे. अकार्यक्षम कारभाराचा ठपका ठेवत भाजप या आमदारांना डच्चू देणार असल्याचे सांगण्यात आले असून काही माजी मंत्र्याचाही या यादीत समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप काही विद्यमान आमदारांना डच्चू देण्याच्या मार्गावर आहे. अकार्यक्षम कारभाराचा ठपका ठेवत भाजप या आमदारांना डच्चू देणार असल्याचे सांगण्यात आले असून काही माजी मंत्र्याचाही या यादीत समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

भलेभले ईडीला घाबरतात पण, शरद पवार...

काल (ता.26) दिल्ली येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय संयंसेवक संघाने या जागांवरील बदलाची सूचना केल्याची माहिती आहे. तसेच, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतही या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्र्यांच्या पीएना आमदारकीचे वेध

भाजपच्या कोणत्या आमदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे..

1) प्रकाश मेहता - घाटकोपर पूर्व 
2) राम कदम - घाटकोपर पश्चिम
3) सरदार तारासिंग -मुलुंड
4) विद्या ठाकूर - गोरेगाव
5) भारती लवेकर-  वर्सोवा
6) कॅप्टन तामिळ सिल्वन - सायन कोळीवाडा
7) मंदा म्हात्रे - बेलापूर
8) संजय केळकर -  ठाणे शहर
9) विष्णू सावरा- विक्रमगड
10) संगीता ठोबरे - केज
11) अनिल गोटे- धुळे शहर
12) देव्यांनी फरांदे- नाशिक
13) डॉ.मिलिंद माने- नागपूर उत्तर
14) गोवर्धन शर्मा- अकोला पश्चिम 
15) अमरीश आत्राम- अहिरे
16) चरण वाघमारे- तुमसर
17) राजकुमार बडोले- अर्जुनी मोरगाव
18) दिलीप कांबळे- पुणे छावणी
19) विलासराव जगताप- जत
20) शिवाजी कर्डीले- राहुरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Will reject 20 Current MLA ticket in Vidhansabha election 2019 along with Ram Kadam