बारावी इंग्रजी विषयाच्या ‘त्या’ प्रश्नाचा निर्णय ठरला; ‘या’ विद्यार्थ्यालाच मिळतील ६ गुण

इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाचा शेवटचा पोएट्रीचा प्रश्न देण्याऐवजी उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला दिलेल्या सूचना छापल्या गेल्या होत्या. त्या प्रश्नाला कशा पद्धतीने गुण द्यायचे, याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष मंडळाने घेतला आहे.
sakal breaking notifiction
sakal breaking notifictionsakal

सोलापूर : इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाचा शेवटचा पोएट्रीचा प्रश्न देण्याऐवजी उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला दिलेल्या सूचना छापल्या गेल्या होत्या. त्यासंदर्भात बहुतेक विद्यार्थी संभ्रमात पडल्याचे पहायला मिळाले. त्या प्रश्नाला कशा पद्धतीने गुण द्यायचे, याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष मंडळाने घेतला आहे.

पुणे बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्ष २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये चूक तथा त्रुटी राहिली होती. त्यासंदर्भात आता पुणे बोर्डाने विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत. प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास किंवा त्या प्रश्नावरील तीन प्रश्न सोडवलेल्या विद्यार्थ्यांनाच सहा गुण दिले जाणार आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे चुकीची जरी लिहिली असल्यास तरीदेखील गुण मिळणार आहेत.

ठळक बाबी...

  • पोएट्री सेक्शन-२, पोएट्री किंवा सेक्शन-२ असा केवळ उत्तरपत्रिकेत उल्लेख केला असल्यास तरीदेखील मिळणार ६ गुण

  • पोएट्री सेक्शन-२ मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास मिळतील गुण

  • त्रुटी असलेल्या प्रश्नांचे क्रमांक ए-३, ए-४ आणि ए-५ असे केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास त्या विद्यार्थ्याने सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे ग्राह्य धरून सहा गुण दिले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com