समीर वानखेडेंना अटकेपासून उच्च न्यायालयाने दिलं संरक्षण

समीर वानखेडे यांनी कमी वयात मद्यविक्रीचा परवाना मिळविल्याचे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे
 Sameer Wankhede
Sameer Wankhedeटिम ई सकाळ

एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी कमी वयात मद्यविक्रीचा परवाना मिळविल्याचे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) दिलेल्या तक्रारीनंतर ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यामध्ये समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तक्रारीवरून मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.

ही एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी वानखेडेंनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली असून अर्ज दाखल केला आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम संरक्षण दिलेत.

 Sameer Wankhede
मलिकांवरील ईडी कारवाईनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 2 फेब्रुवारी रोजी समीर वानखेडे यांच्या मालकीच्या सद्गुरु बार आणि रेस्टॉरेंटचा (Bar and Restaurants) परवाना रद्द केला होता. समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले (Shankar Gogavale) यांनी तक्रार दाखल केली होती. गोगावले यांनी शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास कोपरी पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली. समीर वानखेडे यांनी खोटी माहिती दिली आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्य विक्रीचा परवाना मिळवला अशी माहिती गोगावले यांनी तक्रारीत दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com