केजरीवाल यांना मागे टाकत उद्धव ठाकरे यांनी मारली बाजी, वाचा काय केलंय उद्धव ठाकरेंनी...

केजरीवाल यांना मागे टाकत उद्धव ठाकरे यांनी मारली बाजी, वाचा काय केलंय उद्धव ठाकरेंनी...

मुंबई - विधानसभा २०१९, एका अशी निवडणूक ज्यांच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला. महाराष्ट्राला जे वाटलं नव्हतं ते सर्वाकाही घडलं. महाविकास आघाडीच्या हातात महाराष्ट्राच्या चाव्या गेल्यात आणि ठाकरे घराण्यातील पहिलीवहिली व्यक्ती मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी ताबा घेतल्यांनंतर उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा थेट अनुभव नाही, महाराष्ट्राची जबाबदारी आणि मुख्यत्त्वे विरोधकांचा सामना उद्धव ठाकरे कसा करतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. 

महाराष्ट्रातला राजकीय वादंग, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा या मागोमाग आलेलं कोरोनाचं संकट. अशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कशाप्रकारे गोष्टी हाताळणार याबद्दलची चर्चा झाली. एकंदर सत्तेत आल्यापासून ते अगदी कोरोनाच्या या गेल्या दोन महिन्यांचा कालावधीत उद्धव ठाकरे कायम चर्चेत राहिलेत. नुसते चर्चेतच राहिले नाहीत तर त्यांची लोकप्रियता देखील चांगली असल्याचं सी व्होटरच्या एका सर्वेक्षणातून समोर आलं.

सी व्होटरतर्फे भारतातील प्रसिद्ध नेत्यांबद्दल एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा देखील आढावा घेण्यात आला होता. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पकडून तीन हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. ज्यामध्ये महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांचा नंबर पाचव्या क्रमांकावर आलाय. महत्त्वाची बाब म्हणजे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय नेता म्हणून उद्धव ठाकरे यांनी गुण मिळवले आहेत. 

कोणत्या मुख्यमंत्र्यांना किती टक्के मिळाले : 

  • ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक- ८३ टक्के 
  • छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल - ८१ टक्के 
  • केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन - ८० टक्के
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी - ७८ टक्के
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - ७६ टक्के
  • दिल्लीचे मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल - ७४ टक्के 

 या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल देखील सर्व्हे करण्यात आला. यामध्ये नरेंद्र मोदी यांना ६२.२% मते पडलीत तर राहुल गांधी यांना २३.२१ टक्के मते पडली आहेत.

c voters survey about most popular cm of maharashtra uddhav thackeray is on rank 5  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com