Cabinet Expansion: मुख्यमंत्र्यांच्या सर्व नियोजित बैठका ढकलल्या पुढे; आजच होणार शपथविधी

Cabinet Expansion
Cabinet ExpansionEsakal

नवी दिल्ली : राष्ट्रवा्या सरकार समावेशानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. पण हा विस्तार आजच होऊन शपथविधी देखील पार पडेल अशी माहिती साम टिव्हीच्या सुत्रांनी दिली आहे. (Cabinet Expansion today All scheduled meetings of CM Eknath Shinde postponed)

Cabinet Expansion
UCC: "मुस्लिमांना धडा शिकवण्याच्या नादात देशाचं होणार नुकसान"; ओवैसी पहिल्यांदाच बोलले

गेल्या तीन-चार दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका सुरु होत्या. खाते वाटप त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार याबाबत सखोल चर्चा सुरु होती. मात्र, याला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. कारण आजच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यानंतर लवकरच खाते वाटपही केलं जाणार आहे. (Latest Marathi News)

Cabinet Expansion
Cabinet Expansion : मुख्यमंत्र्यांच्या सर्व नियोजित बैठका ढकलल्या पुढे; आजच होणार शपथविधी

काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर आज मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. आजच राजभवनावर शपथविधी होणार आहे. त्याअनुषंगानं राजभवनावर हालचालींना वेग आलेला आहे. त्याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. आजच्या शपथविधीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांचाच समावेश असणार आहे. त्यानंतर खातेवाटपही जाहीर होण्याची शक्यता आहे. (Marathi Tajya Batmya)

Cabinet Expansion
Nashik : बस दरीत कोसळून सप्तश्रृंगी घाटात भीषण अपघात; अजितदादांनी घेतली दखल, प्रशासनाला दिल्या 'या' सूचना

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांचा अचानक सत्तेत शिरकाण आणि मंत्रिपदाची शपथ यामुळं शिवसेना आणि भाजपमधील आमदार जे मंत्रीपदासाठी इच्छुक होते, त्यांच्यामध्ये नाराजी होती. पण आता हा तिढा सोडवण्यात यश आलं आहे. यामध्ये अजित पवारांना अर्थ खातच मिळण्याची दाट चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com