Pankaja Munde : "एकाच कार्यक्रमात पाच-पाच नेते कशाला..." ; पंकजा मुंडेंच्या गैरहजेरीवर भाजपची भूमिका

 Pankaja Munde
Pankaja Munde

भाजपमध्ये पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा महाराष्ट्राला नवी नाही. मात्र ही चर्चा आत पुन्हा एकदा सुरु झाली आहे. बीडमध्ये श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गहिनीनाथ गडावर येणार आहेत. त्यांच्यासोबत पंकजा मुंडे सुद्धा याठिकाणी हजेरी लावणार होत्या. (Chandrashekhar Bawankule on Pankaja Munde)

मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर भाजपमधून मोठी प्रतिक्रिया आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबात प्रश्न विचारण्यात आला. यावर बावनकुळे म्हणाले, "पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. मराठवाडा पदवीधर अर्जासंदर्भात त्यांच्याशी माझे बोलणं झालं. त्यांची प्रकृती परवा चांगली नव्हती. कधी-कधी वयैक्तिक अडचणी येतात. याचा अर्थ त्यांनी दांडी मारली असा होत नाही."

"आम्ही ठरवलं आहे की एक नेता गेल्यानंतर दुसऱ्या नेत्याला त्याठीकाणी कशाला हजर असले पाहीजे. एखाद्या विधानसभेचे भुमीपूजन आहे, उद्घाटन आहे. तेव्हा ठीक आहे. मात्र एकाच कार्यक्रमात पाच-पाच नेते कशाला, त्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम केले पाहिजे," असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

 Pankaja Munde
Nepal: नेपाळ विमान दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू

पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप -

पंकजा मुंडे यांना ठाकरे गटाची ऑफर आहे यावर बावनकुळे म्हणाले, "पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे. त्या कधीच जाऊ शकत नाहीत. ठाकरे गटाला त्यांचा पक्ष सांभळता येत नाहीत त्यामुळे ते अशा चर्चा करतात. त्यांचा पक्ष त्यांनी सांभाळला पाहीजे. पंकजा मुंडे यांच्या बद्दल त्यांनी अफवा पसरवू नये. पंकजा मुंडे यांना कोणीही फूस लावू शकत नाही ऐवढ्या त्या प्रगल्भ नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श त्यांच्यावर आहे. 

 Pankaja Munde
Chandrashekhar Bawankule : "केंद्राच्या पाठिंब्याशिवाय मुंबई..." ; बावनकुळेंचे वक्तव्य चर्चेत

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर देखील भाष्य केले. "नरेंद्र मोदी राजकीय सभा घ्यायला येत नाहीत आहेत. नरेंद्र मोदी विकासासाठी येत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मदत करण्यासाठी नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. केंद्राच्या पाठिंब्याशिवाय मुंबई सुंदर शहर होऊ शकत नाही", असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

 Pankaja Munde
Ajit Pawar : 'दोनच अपत्यावर थांबा, पलटण वाढवू नका'; अजित पवारांचा महिलांना सल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com