Chandrashekhar Bawankule : "केंद्राच्या पाठिंब्याशिवाय मुंबई..." ; बावनकुळेंचे वक्तव्य चर्चेत

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबईत अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोसचा दौरा कमी केला असून ते १८ जानेवारीला मुंबईत परतणार आहेत. दावोसची बैठक १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत आहे. (Chandrashekhar Bawankule on Narendra Modi Mumbai Tour)

मुंबई महापालिका निवडणुकीचे उद्दिष्ट ठेऊन नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नरेंद्र मोदी राजकीय सभा घ्यायला येत नाहीत आहेत. नरेंद्र मोदी विकासासाठी येत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मदत करण्यासाठी नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. केंद्राच्या पाठिंब्याशिवाय मुंबई सुंदर शहर होऊ शकत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar : 'दोनच अपत्यावर थांबा, पलटण वाढवू नका'; अजित पवारांचा महिलांना सल्ला

बीडमध्ये श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गहिनीनाथ गडावर येणार आहेत. त्यांच्यासोबत पंकजा मुंडे सुद्धा याठिकाणी हजेरी लावणार होत्या. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. 

Chandrashekhar Bawankule
Shahrukh Khan: शेवटी बादशाहचं तो! 'पठाण'चं ट्रेलर झळकलं बुर्ज खलिफावर

 पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप-

"पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. मराठवाडा पदवीधर अर्जासंदर्भात त्यांच्याशी माझे बोलणं झाले. त्यांची प्रकृती परवा चांगली नव्हती. कधी कधी वयैक्तिक अडचणी येतात. याचा अर्थ त्यांनी दांडी मारली असा होत नाही. आम्ही ठरवलं आहे की एक नेता गेल्यानंतर दुसऱ्या नेत्याला त्याठीकाणी कशाला हजर असले पाहीजे. एखाद्या विधानसभेचे भुमीपूजन आहे, उद्घाटन आहे. तेव्हा ठीक आहे. मात्र एकाच कार्यक्रमात पाच-पाच नेते कशाला, त्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम केले पाहिजे," असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

Chandrashekhar Bawankule
Khashaba Jadhav : इकडे महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपली अन् तिकडं 'गुगल'ची खाशाबांना सलामी

पंकजा मुंडे यांना ठाकरे गटाची ऑफर आहे, यावर बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे. त्या कधीच जाऊ शकत नाहीत. ठाकरे गटाला त्यांचा पक्ष सांभळता येत नाहीत त्यामुळे ते अशा चर्चा करतात. त्यांचा पक्ष त्यांनी सांभाळला पाहीजे. पंकजा मुंडे यांच्या बद्दल त्यांनी अफवा पसरवू नये. पंकजा मुंडे यांना कोणीही फूस लावू शकत नाही ऐवढ्या त्या प्रगल्भ नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श त्यांच्यावर आहे. 

Chandrashekhar Bawankule
Joshimath : इस्रोने घेतला अहवाल मागे, मोदी सरकारने तज्ज्ञ संस्थांना...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com