''यासाठी आपण सर्व विसरून एकत्र...'', भाजपच्या बावनकुळेंचं थेट सोनिया गांधींना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Bawankule Letter To Sonia Gandhi

'यासाठी आपण सर्व विसरून एकत्र', बावनकुळेंचं थेट सोनिया गांधींना पत्र

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना (Nana Patole) बरखास्त करण्याबाबत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिले आहे. पटोले सातत्याने समाजविघातक वक्तव्य करून सामाजिक शांतता बिघडवत आहेत. आपल्या पक्षासोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी राष्ट्राचे हित जोपासत आपण सर्व विसरून एकत्र यावे, असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

नाना पटोलेंनी दोन वादग्रस्त वक्तव्य केली. त्यामुळे समाजमन संतप्त झाले आहे. पटोलेंनी काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान मोदींचा अवमान करणारे विधान केले होते. या वक्तव्यानंतर समाजातील सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. सर्वांनीच पटोलेंचा निषेध केला आहे, असं बावनकुळेंनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त महात्मा गांधी यांच्या हत्येचा 'वध' असा उल्लेख नाना पटोलेंनी केला. 'वध' हा राक्षसांचा होत असतो, महापुरुषांचा नाही. ही सामान्य बाब जबाबदार व्यक्तीला समजू नये ही अत्यंत खेदाची बाब आहे. या दोन्ही आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधानावरून पटोलेंनी माफी देखील मागितली नाही. काँग्रेस पक्ष हा या देशातील जुना पक्ष आहे. या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदींचा अवमान करतो आणि काँग्रेस पक्ष त्यांची विकृती खपवून घेतो ही बाब सर्वांनाच खटकणारी आहे, असंही बावनकुळे म्हणाले.

पटोलेंच्या अशा विकृतींच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण झाली आहे. अशा बेजबाबदार व्यक्तीवर आपण कठोर कारवाई करावी आणि त्यांना पदावरून तत्काळ बरखास्त करावे, अशी विनंती बावनकुळेंनी पत्रातून सोनिया गांधींना केली आहे.

Web Title: Chandrashekhar Bawankule Letter To Sonia Gandhi Demanding Dismiss Nana Patole

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top