
नागपूर : ‘‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्याची भरपाई देणे ही सरकारची जबाबदारी आहे. माणिकराव कोकाटे काय बोलले हे मला माहीत नाही. कृषीमंत्री कोकाटे यांनी काही म्हटले असेल तर सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांची माफी मागू,’’ असे स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.