मुख्यमंत्री महोदय 'त्या' पीडितेची पूजा चव्हाण होऊ देऊ नका, चित्रा वाघ यांची विनंती

'त्या पिडित मुलीच काही बरं-वाईट झालं तर त्याला जबाबदार राज्य सरकार असेल'
political
politicalesakal
Summary

'त्या पिडित मुलीच काही बरं-वाईट झालं तर त्याला जबाबदार राज्य सरकार असेल'

मागील काही दिवसांपूर्वीपासून शिवसेनेचे (shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पिडीत तरूणीची कहाणी भाजपच्या (BJP) भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकारांना याआधी ऐकवली होती. कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस (Police) ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Tackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरलं आहे. जर का कुचिकवर कोणतीही कारवाई झाली नाही आणि त्या पिडित मुलीच काही बरं-वाईट झालं तर त्याला जबाबदार राज्य सरकार असेल, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

political
तुम्हीच व्हा की! काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा राहुल गांधींच्याच नावाची चर्चा

आजही त्यांनी ट्विट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबतचा कुचिक यांचा फोटो पोस्ट करत त्या म्हणतात, हाच तो हरामखोर बलात्कारी शिवसेना पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक. ज्याने एका मुलीवर बलात्कार केला व जबरदस्तीने गर्भपात करायलाही भाग पाडले आहं. न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करतं स्वत:ला संपवते म्हणत तीने काल FB पोस्ट केली आहे. मात्र अजूनही त्या मुलीचा तपास लागत नाही. अजित पवारजी ती पिडत मुलगी अजुनही गायब आहे. कुठे गेलीये ती मुलगी की, यानेच तिला गायब केली याचा ही तपास करा. मुख्यमंत्री महोदय हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कुचिकवर तात्काळ ३०७ चा गुन्हा दाखल करा. तिच्या मरणाची वाट बघू नका, त्याआधीच तिला वाचवा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

political
पीडिता आत्महत्येच्या वाटेवर; बलात्कारी नेत्यावर चित्रा वाघांकडून कारवाईची मागणी

दरम्यान, कालही भाजपाच्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत राज्यसरकारला धारेवरं धरलं होत. बलात्कारीत नेत्याला दोनदा बेल मिळाला आहे. त्यानंतर तो ही केस मागे घे, असं म्हणत या मुलीला मॅसेज करतो आहे. तिला त्रास देतो आहे. 'हे मॅसेज कुणाला दाखवायचे त्याला दाखव मला काही फरक पडत नाही.', अशी त्याची भाषा आहे. त्याचा बोलविता धनी कोण आहे? त्याच्या मागे कोण उभं आहे? असे सवालही त्यांनी केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com