चित्रा वाघ यांचा पटोलेंना इशारा; म्हणाल्या, बात निकली है तो....

मोठ्या पप्पूला खूष करण्यासाठी पंतप्रधानांवर टिका केली जातीये; चित्रा वाघ
Chitra Wagh on Nagpur Offensive Dance Viral Video
Chitra Wagh on Nagpur Offensive Dance Viral Videosakal

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्त भाजपाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी नाना पटोले यांच्यावर टीकेचे सुर ओढले आहेत.नानांनी लक्षात ठेवावं…बात निकली है तो दिल्ली तक जाएगी… असा निशाणा त्यांनी ट्विट करत लगावला आहे.

त्या म्हणाल्या, नगर पंचायती निवडणूकीत छोटे पप्पू नाना पटोले नापास झाले.पराभव जिव्हारी लागलाय,काँग्रेस आता संपत आहे.त्यातच नाना विरोधकांचं काम हलकं करताहेत.हे अपयश झाकण्यासाठी मोठ्या पप्पूला खूष करण्यासाठी पंतप्रधानांवर टिका केली जात आहे. नानांनी लक्षात ठेवावं बात निकली है तो दिल्ली तक जाएगी असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

दरम्यान आज याचे पडसाद हिंगोलीमध्ये सुद्धा उमटले आहेत. हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे (Tanhaji Mutkule) यांच्या नेतृत्वाखाली शहरामधून नाना पटोले यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

काय म्हणाले होते नाना पटोले

मोदी नावाच्या व्यक्तीला मी मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो" असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला आणि माध्यमांना प्रतिक्रिया देताना नाना म्हणाले, "मी आमच्या एका गाव गुंडाबद्दल बोलत होतो, त्याचं नाव मोदी आहे. तुम्हाला कोणता मोदी म्हणायचा आहे?" असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला होता. पटोलेंच्या या विधानावर भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी कठोर शब्दात टीकास्त्र सोडलं.

नाना पटोलेंचं दुसरं वादग्रस्त विधान -

नाना पटोले रविवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गावगुंड मोदींबद्दल माध्यमासोबत चर्चा केली. त्यावेळी ज्यांची पत्नी सोडून जाते त्यांचं नाव मोदी ठरतं, असं वादग्रस्त विधान पटोलेंनी केलं. त्याविरोधात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं असून पटोलेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com