'काळजी नको ! पुरुन उरेन तुम्हाला, चित्रा वाघ म्हणतात मला' | Chitra Wagh Comment On Vidya Chavan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp leader chitra wagh

'काळजी नको ! पुरुन उरेन तुम्हाला, चित्रा वाघ म्हणतात मला'

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे नाट्य रंगले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही वाॅर्डातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान राष्ट्रवादी (NCP) महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना दिले होते. त्याचा समाचार वाघ यांनी घेतला आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की मेरे सच को नागवार तेरे झूठ की गवाही है, करते रहेना छोटी बाते, यह तो तेरी फितरत है, और तेरी हर ओछि बात का जवाब देना यह तो मेरी तौहीन है.

हेही वाचा: OBC Reservation : CM ठाकरेंनी राजीनामा द्यावा - चंद्रकांत पाटील

एक गेली आता दुसरी आली. काळजी नको ! पुरुन उरेन तुम्हाला, चित्रा वाघ म्हणतात मला, या शब्दात चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांचा समाचार घेतला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सत्तेत येईल, असे भाकित धुळ्यात वर्तवले होते. यावर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी टीका केली.

हेही वाचा: राजीव गांधींच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं होतं?

मुंबईत पूर्वी पदपथावर पोपट घेऊन बसणारे कुडमुडे ज्योतिषी दिसत. हल्ली ते क्वचितच दिसतात. त्यातही महिला कुडमुडी ज्योतिषी भेटणे म्हणजे मुंबईकरांची पूर्वजन्मीची पुण्याईच फळाला आली म्हणायची, असा टोला वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

Web Title: Chitra Wagh Criticize Ncp Leader Vidya Chavan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpNCPChitra Wagh
go to top