'एक मंत्री तुरुंगात, दुसरा मोकाट! शेवटी राजा कालस्य कारणं'

पोलिस दलावर वचक ठेवण्या एव्हढी किमान नैतिकताही राज्यकर्त्यांकडे शिल्लक नाही.
chitra wagh
chitra wagh

मुंबईत पीडित विवाहितेलाच पोलिस उप-निरीक्षकाने अश्लील फोटो पाठवले आहेत. मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आल्याने पोलिस (Mumbai Police) दलाला काळीमा फासणारी गोष्ट घडल्याने संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police) संबंधित पोलिस उपनिरीक्षका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपाच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी यासंदर्भात ट्विट करत हल्लाबोल केला आहे. यात त्या म्हणतात, मुंबईत पीडित विवाहितेलाच पोलिस उप-निरीक्षक अश्लील फोटो पाठवत असल्याची घटना संतापजनक आहे. पोलिस दलावर वचक ठेवण्या एव्हढी किमान नैतिकताही राज्यकर्त्यांकडे शिल्लक नाही. एक माजी गृहमंत्री तसेच एक आजी मंत्री तुरुंगात आहे. आणि बलात्कारी मंत्री मोकाट फिरत आहे. शेवटी राजा कालस्य कारणं, असा खोचक टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

chitra wagh
शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; गायकवाड म्हणाल्या..

दरम्यान, मुंबईतील (Mumbai) शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police) संबंधित पोलिस उपनिरीक्षक शंकर पाटणकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली असून या आरोपांमागची सत्यताही पोलिस पडताळून पाहत आहेत. एका महिलेशी पोलिसच असं वागत असतील तर, सामान्यांचं काय? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होत आहे. आता विरोधकांनीही यावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

chitra wagh
संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com