'राज्यसरकार असेल थंड; आता आम्हीच पुकारू बंड'; चित्रा वाघ संतापल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

'राज्यसरकार असेल थंड; आता आम्हीच पुकारू बंड'

वर्ध्यातील आर्वी (Aarvi) येथील गर्भपात प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाद्वारे (SIT) होणार आहे. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. कायदा आणि सुवव्यवस्था यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या घटनेते ११ कवट्या ५४ हाडं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. याप्रकरणी आरोपी महिला डॉक्टरनं आपला गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. यावर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटद्वारे व्हिडिओ शेअर केला आहे. कायदे कमजोर नाहीत, कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलाय. राज्यसरकार असेल थंड, तर आता आम्हीच पुकारू बंड असेही त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाचा: मुंबै बँक निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती?

त्या म्हणतात, राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतच आहे, आणि आता तर अल्पवयीन तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झाला आहे. ३०-३० हजारात सौदेबाजी सुरु आहे. चिमुकल्या जीवांशी खेळ चालु आहे. तेरा वर्षाच्या एका मुलीवर अत्याचार करण्यात आला. ती गर्भवती राहिली आणि आरोपीने तीस हजारात गर्भपात करुन घेतला. ११ जानेवारीला ही घटना समोर आली. त्याठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. काही कवठ्या, हाडे, गर्भ पिशव्या याठिकाणी सापडल्या. याचा अर्थ मोठा गोरखधंदा तिथं चालू होता, किती गर्भपात केले गेले, किती मुलांना मारलं गेलं, किती चिमुकल्यांची हत्या केली गेली हे सांगता येणार नाही. या घटनेने सांगलीच्या म्हैसाळची पुनरावृत्ती झाल्याची आठवण झाली.

या घटनेवेळेही सरकार ॲक्शनमध्ये आलं. पीसीपीएनडीटी अॅक्ट त्याची अंमलबजावणी, फ्लाईंग स्कॉड या सगळ्या गोष्टी केल्या. परंतु गेल्या अडीच वर्षांमध्ये पुन्हा एकदा सगळं थंड बास्तनामध्ये पडलं आहे. या सगळ्या प्रकरणाचा मूळ हे राज्याच्या कायदा व सुव्यवस्था यांच्याकडं जातं, असही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

हेही वाचा: नितेश राणेंना अटकेपासून दिलासा कायम, सोमवारी निकाल

पुढे त्या म्हणाल्या, गेल्या अडीच वर्षांत निर्माण केलेल्या या फ्लाईंग स्कॉडने नक्की काय काम केले आहे. त्यांची अकाऊंटॅबिलीटी कुणी केली आहे का ? याची माहितीही महाराष्ट्राला मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर ती नक्कीच गृहविभाग आणि पब्लिक हेल्थ यांनी एकत्र येऊन एखादा प्लॅन बनवला पाहिजे. कायदे हे कधीच कमजोर असतात पण त्याची अंमलबजावणी करणारे मात्र त्याठिकाणी कमजोर झाले आहेत, असा घणाघातही त्यांनी केला आहे. राज्यांमध्ये 25 हजार महिला गायब झाल्याची धक्कादायक माहिती गृह मंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्याच्या कित्येक मुलींसोबत कसा प्रकार झाला असेल याची भीती वाटते आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सूचवले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top