Churchgate Hostel Murder Case: "मृत विद्यार्थीनीनं अनेकदा केली होती तक्रार, पण..."; पीडितेच्या मैत्रिणी झाल्या व्यक्त

चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले महिला शासकीय वसतीगृहात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
Mumbai Police outside the Churchgate girls hostel
Mumbai Police outside the Churchgate girls hostelsakal

मुंबई : इंजिनीयर होण्याचं स्वप्न बाळगून अकोल्यातून मुंबईत शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या १८ वर्षांच्या तरूणीची मंगळवारी चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले महिला शासकीय वसतीगृहात हत्या झाली. यातील प्रमुख आरोपी असलेला सुरक्षारक्षक जाता येता त्रास देतो, छेडखानी करतो अशा तक्रारी या पिडीतेनं वसतीगृहाच्या वॉर्डनकडे केली होती.

मात्र, वार्डननं या तक्रारीची दखलच घेतली नाही. त्यामुळं आमच्या मैत्रीणीला जीव गमवावा लागला असल्याचं मृत विद्यार्थीनीच्या मैत्रीणींनी 'सकाळ'शी बोलताना सांगीतलं. (Churchgate Hostel Murder Case then her life would have been saved need to know how)

Mumbai Police outside the Churchgate girls hostel
'औरंगजेबी' प्रवृत्ती डोकं वर काढतील तेव्हा...; राज ठाकरेंनी व्हिडिओ पोस्टमधून दिला इतिहासाचा दाखला

या हत्या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी असलेल्या सुरक्षा रक्षकानं मंगळवारीच पहाटे मरीन लाईन्स रेल्वे मार्गावर रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. मृतकाच्या खिशात तरुणीचा मृतदेह सापडलेल्या खोलीची चावी सापडली असल्याचं मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

मयत विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी वसतीगृह प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. यात वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर एका पिडीतेला एकटं का ठेवण्यात आलं होतं? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळं पोलिसांच्या तपासाची चक्रे या दिशेने फिरली आहेत.

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आत्तापर्यंत वसतीगृहातील ७ ते ८ कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. ती राहत असलेल्या चौथ्या माजल्यावर सीसीटीव्ही कार्यान्वित नव्हती अशी माहिती पुढं आल्यानं वसतीगृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ((Latest Marathi News))

Mumbai Police outside the Churchgate girls hostel
Kolhapur Bandh: कोल्हापुरातील इंटरनेट कधीपर्यंत बंद राहणार? गृह विभागाच्या सचिवांनी सांगितली तारीख आणि वेळ

पोलिस तपासात उघड झालेल्या त्रृटी

  1. होस्टेलमधील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद

  2. आरोपी ओमप्रकाश कनोजिया हॉस्टेलमध्ये अनाधिकृतपणे काम करत होता

  3. विद्यार्थ्यांचे कपडे इस्त्री करण्याचे काम तो करायचा

  4. चौथ्या मजल्यावर पिडीतेला एकटं ठेवले

Mumbai Police outside the Churchgate girls hostel
Sanjeev Jeeva Assassination: मुख्तार अन्सारीला इशारा? जवळच्या सहकाऱ्याची हत्या! यूपीच्या कोर्टात घडला थरार

पीडित मुलीच्या वडिलांनी उपस्थित केले प्रश्न

माझ्या मुलीला एकटीला चौथ्या माळ्यावर का ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी सीसीटीव्ही का नव्हता. वांरवार माझ्या मुलीने वार्डनकडे तक्रारी करूनही त्याची दखलचं घेतली नाही. त्यामुळं वार्डनसह सर्व दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजेत, अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केल आहे. (Marathi Tajya Batmya)

Mumbai Police outside the Churchgate girls hostel
Jejuri News: जेजुरी संस्थानच्या विश्वस्तपदाचा विषय अखेर मार्गी! ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश

फॉरेन्सिक पथकामार्फत शोध घेणार

या आरोपीनं रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली आहे. वसतीगृहातील सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरु आहे. अजूनपर्यंत संशयास्पद काही दिसलं नाही. आरोपी चौथ्या मजल्यावर वेगळ्याच मार्गांनं गेल्याचा संशय आहे. त्यामुळं फॉरेन्सिक पथकाच्या मार्फत फिंगर प्रिंट शोधण्याचं काम सुरू आहे. फार पुर्वीपासून आरोपी या वसतिगृहात इस्त्री करण्याचं काम करत होता. यासोबतच सुरक्षा रक्षकाचंही काम करत होता.

मात्र, तो तिकडे कंत्राटी पद्धतीनं काम करत होता की अवैधपणे. याबद्दल सध्या तरी नेमकी काही माहिती मिळालेली नाही. मात्र, त्याला वसतिगृह प्रशासनाकडून पैसे दिले जात होते, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे, अशी माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक निलेश बागुल यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com