esakal | हेच ते मराठीचे 'मारक' मेहता; गुजरातींची मस्ती उतरवण्याचा मनसेचा इशारा!
sakal

बोलून बातमी शोधा

Khopkar-babuji

मुंबईची मुख्य भाषा मराठी आहे, हे सर्वांना माहिती असूनही डेली सोपमधून वारंवार मराठीचा अपप्रचार केला जातो. त्यामुळे गुजराती किड्यांची वळवळ थांबवावी लागेल.

हेच ते मराठीचे 'मारक' मेहता; गुजरातींची मस्ती उतरवण्याचा मनसेचा इशारा!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका असलेली 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मराठीतून 'गोकुलधामची दुनियादारी' या नावाने प्रसारित केली जाते. या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात गोकुलधाम सोसायटीमधील रहिवाशांमध्ये मातृभाषेवरून भांडण सुरू असल्याचा एपिसोड दाखवण्यात आला. 

- परिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल

शेवटी हे भांडण मिटविण्यासाठी जेठालालचे वडील चंपक लाल उर्फ बाबूजींना मध्यस्थी करावी लागली. त्यांनी सोसायटीतील भांडण मिटविल्यानंतर आता सोसायटीच्या बाहेर भांडण सुरू झाले आहे. बाबूजींच्या तोंडी मुंबईची भाषा हिंदी असल्याचा एक डायलॉग दाखविण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आक्षेप घेतला आहे. तसेच सब टीव्हीने याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली आहे. 

- #HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'!

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मनसेची भूमिका जाहीर केली. हे तारक मेहता नाही, तर मराठीचे 'मारक' मेहता असल्याचे खोपकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुंबईची मुख्य भाषा मराठी आहे, हे सर्वांना माहिती असूनही डेली सोपमधून वारंवार मराठीचा अपप्रचार केला जातो. त्यामुळे गुजराती किड्यांची वळवळ थांबवावी लागेल. एकाच गोष्टीची लाज वाटत आहे, ती म्हणजे या मालिकांमध्ये काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची अजिबात शरम वाटत नाही.

- निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा रखडण्यावरून ऋषी कपूर यांनी केलं 'असं' ट्वीट..लोकांनी केली स्तुती

'आपलं गोकुलधाम कुठं आहे? मुंबईत आणि मुंबईची भाषा काय आहे? हिंदी,' असा एक डायलॉग बाबूजी म्हणताना दिसत आहेत. यामुळे गुजरातींची मस्ती उतरावी लागेल, असा इशाराही खोपकरांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप