esakal | #HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'!
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha-Kapoor

शाळेत असल्यापासून माझा श्रद्धावर क्रश होता. पण याबाबत मी कधी तिच्याशी बोललो नाही.

#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

श्रद्धा सध्या बागी-३ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्यामुळे ती तिचा वाढदिवस कुटुंबीयांसोबत सेलिब्रेट करणार की अजून कुणासोबत याची माहिती मिळाली नाही. मात्र, काल (ता.२) श्रद्धाने तिचा वाढदिवस तिचा लहानपणीचा मित्र आणि बागी-३ चा हिरो टायगर श्रॉफसोबत साजरा केला. टायगरचा २ मार्च तर श्रद्धाचा ३ मार्चला वाढदिवस असल्याने त्यांनी एकत्रच केक कट केला. टायगर ३० व्या तर श्रद्धा ३३ व्यावर्षात पदार्पण करत आहेत.

- मुलगा अब्रामने काढलं 'असं' चित्र, त्यावर शाहरुख म्हणाला...

सध्या टायगर आणि श्रद्धा हे चित्रपटाच्या प्रमोशनिमित्ताने दुबईमध्ये आहेत. त्यामुळे श्रद्धा ही तिच्या मित्रपरिवाराबरोबरच यंदा बर्थडे साजरा करणार असे स्पष्ट दिसत आहे. बागी-३ च्या प्रमोशनदरम्यान टायगरने श्रद्धाबाबच एक अजब खुलासा केल्यामुळे सध्या याची जोरदार चर्चा होत आहे. प्रमोशनदरम्यान टायगर म्हणाला की, ''शाळेत असल्यापासून माझा श्रद्धावर क्रश होता. पण याबाबत मी कधी तिच्याशी बोललो नाही.'' शाळेतल्या अनेक आठवणी टायगर आणि श्रद्धाने यावेळी सांगितल्या. 

- हृतिक रोशनचे लवकरच हॉलीवूडमध्ये पदार्पण

टायगरप्रमाणेच बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्याचा श्रद्धावर क्रश होता, तो अभिनेता म्हणजे वरुण धवन. होय, वरुण धवनने डान्स प्लस या रिअॅलिटी शो दरम्यान श्रद्धा ही शाळेत असल्यापासून माझी क्रश होती, हे जगजाहीर केले होते. 

श्रद्धाबाबत बोलताना वरुण म्हणाला होता की, खूप वर्षांपूर्वी श्रद्धा माझी क्रश होती. अनेकांसाठी ती आरोही आहे, कुणासाठी ती विनी तर कुणासाठी ती इनायत आहे. पण माझ्यासाठी ती पहिल्यापासून श्रद्धाच आहे. 

- दलजीतची इव्हान्काला 'ऑफर'; तर मनोज वाजपेयी पडले हॉलिवूडवर भारी!

श्रद्धाने टायगर श्रॉफ बरोबर बागी-३ मध्ये तर वरुण धवन सोबत स्ट्रीट डान्सरमध्ये सहअभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. येत्या ६ मार्चला श्रद्धा आणि टायगरचा बागी-३ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

loading image