निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा रखडण्यावरून ऋषी कपूर यांनी केलं 'असं' ट्वीट..लोकांनी केली स्तुती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 March 2020

निर्भया केस मधील आरोपींची फाशी तिसऱ्यांदा रखडल्यामुळे अभिनेते ऋषी कपूर यांनी आपली नाराजी व्यक्त केलीये.

निर्भया केस मधील आरोपींची फाशी सोमवारी पुन्हा एकदा रखडली..पटियाला हाऊस कोर्टाने पुढच्या आदेशापर्यंत या आरोपींची फाशीची शिक्षा थांबवली आहे. अशा प्रकारे एकदा नाही दोनदा नाही तर सलग तिसऱ्यांदा निर्भयाच्या आरोपींची फाशी रखडली आहे..निर्भया केस मधील दोषी पवन गुप्ता याने आयत्या वेळी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केलाय..पवनने हा अर्ज सोमवारी दुपारी वडील आणि वकील यांच्यामार्फत दाखल केला होता..राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत..ते तिथून परत आल्यावरच यावर निर्णय होऊ शकणारे..

हे ही वाचा : परिणीती चोप्राचा हॅरी पॉटर अवतार, व्हिडिओ होतोय व्हायरल

ऋषी कपूर यांनी केलं असं ट्वीट-

आता या मुद्द्यावर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांची प्रतिक्रिया समोर आलीये..निर्भया केस मधील आरोपींची फाशी तिसऱ्यांदा टळण्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीये..त्यांनी त्यांची नाराजी सनी देओलच्या दामिनी सिनेमातील डायलॉग लिहून व्यक्त केली आहे.. 'निर्भया केस. तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख..- 'दामिनी', खरंच हास्यास्पद...!

हे ही वाचा : निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा रखडली

तर दुसरीकडे ऋषी कपूर हे त्यांच्या ट्वीटमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात...मात्र या वेळी त्यांच्या या ट्वीटचं लोक समर्थन करत आहेत..

rishi kapoor tweet went viral on nirbhaya case people said absolutely right


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rishi kapoor tweet went viral on nirbhaya case people said absolutely right