Indias cleanest state: स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सासवडने मारली देशात बाजी! महाराष्ट्र नंबर 1, मुंबईचा क्रमांक कितवा जाणून घ्या

Indias cleanest state: एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले सासवडने पहिला नंबर पटकावला. लोणावळा तिसरा क्रमांकावर आहे, तर ३ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांत नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Indias cleanest state
Indias cleanest stateEsakal

केंद्र सरकारने आज (गुरुवारी) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये एका लाखाहून कमी लोकसंख्या असलेले पुणे जिल्ह्यातील सासवड शहर देशातले सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडले गेले आहे. तर एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्राची नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भोपाळ सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. तर एका लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड प्रथम आहे, छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातीलच लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे. यावेळी देशातील स्वच्छ राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला प्रथम, मध्य प्रदेशने द्वितीय तर छत्तीसगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे. गेल्या वेळी मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर होता.

Indias cleanest state
PM Narendra Modi: ‘नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेणार’; शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य

गंगेच्या काठावर वसलेल्या स्वच्छ शहरांमध्ये वाराणसी पहिल्या तर प्रयागराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप पुरी यांनी या राज्यांच्या प्रतिनिधींचा गौरव केला.

यावेळी एकूण 9500 गुणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील महूला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सुरक्षित शहर पुरस्कार चंदीगडला देण्यात आला आहे.

Indias cleanest state
Nawab Malik: नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; मनी लाँड्रिंग प्रकरणात ६ महिन्यांसाठी जामीन केला मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com