CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांची सत्तेतील पहिली होळी कशी जाणार? ज्योतिषी म्हणाले 'हा' रंग.. | Holi Festival | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde Astrology

CM Eknath Shinde Astrology : मुख्यमंत्री शिंदे यांची सत्तेतील पहिली होळी कशी जाणार? ज्योतिषी म्हणाले 'हा' रंग..

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता संघर्षावरुन चांगलाच वाद रंगलाय. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची आधीच भक्कम झाली आहे.

होळीनिमित्त आम्ही त्यांची ग्रहस्थिती आणि यंदाची होळी त्यांची कशी जाणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. या संदर्भात ज्योतिषांनी माहिती दिली. (CM Eknath Shinde astrology Holi Festival read what astrologist said)

ज्योतिषांच्या मते, एकनाथ शिंदे यांचे ग्रहयोग सध्या मजबूत आहेत त्यामुळे सत्ता त्यांच्या हाती असणे स्वाभाविक असणार. प्रभावी मंगल, शनी आणि स्वराशीतील गुरु यामुळे एकनाथ शिंदे यांचे प्रभुत्व राजकारणात दिवसेंदिवस वाढेल. शिंदे यांची होळी अत्यंत शुभ असणार त्यांचा शुभ रंग हा केशरी आहे.

निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांना दिल्यामुळे त्यांचा ग्रहयोग उत्तम असल्याचं दिसते. याशिवाय आधीच महाराष्ट्राची सत्ता त्यांच्याकडे आहे आणि वरुन मुख्यमंत्रीपद सुद्धा त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या राशीत गुरु असल्याने त्यांचं प्रभुत्व राहणे स्वाभाविक आहे.

यंदाची होळी ही त्यांच्यासाठी अत्यंत शुभ आणि उत्तम असणार आणि केशरी हा शिवसेनेचा रंग असल्याने तो त्यांच्यासोबतच आहे त्यामुळे शुभ रंग हाच त्यांना होळीच्या आधी निवडणूक आयोगाने दिलाय. त्यामुळे त्यांचे उत्तम दिवस असल्याचे आणि होळी सुख समृद्धीने भरलेली असल्याचे दिसतेय.

- डॉ नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक