Eknath Shinde : राज्यात जिल्हानिहाय मेडिकल कॉलेजेस उभारणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

डॉक्टरांची संख्या कमी असल्याने हा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उभारलं जाईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. साम टीव्हीच्या सामर्थ्य महाराष्ट्राचे वेध भविष्याचा मंथन विकासाचे या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कोरोना काळात आपल्याला आलेल्या अनुभवानंतर आपण हा निर्णय घेत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे.

CM Eknath Shinde
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शिंदे-ठाकरे गटांत जोरदार राडा,VIDEO

साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारलं जाणार आहे. कोरोना काळात आपल्याला अनुभव आला होता की, डॉक्टरांची संख्या कमी होती. त्यामुळे आपण हा निर्णय घेतला आहे." सरकारकडून काही चुकलं तर माध्यमांना सांगण्याचा अधिकार आहे, पण सरकारने चांगलं काम केलं तर तेही आपण सांगणं गरजेचं आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

CM Eknath Shinde
Maharashtra Politics : मध्यरात्रीच्या बैठकांचं सत्र सुरूच; शिंदे-फडणवीस बैठकीत काय शिजलं?

सकाळ माध्यम समुहाविषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "सकाळ समूहाला आम्ही आपलं मानतो. तुम्ही आम्हाला कधीही सूचना करू शकता. फक्त बातम्या देण्यापुरते नाही, तर मी आणि देवेंद्रजी आम्ही विकासाचं ध्येय घेऊन पुढे जात आहोत. सरकार विकासाची जपणूक करण्यासाठी असावं. आम्हाला येऊन तीन चार महिने झालेत तरी लोकांना बदल जाणवतोय की हे सरकार लोकांसाठी काम करणारं आहे." आपलं काम २४ तास सुरू असतं, महाराष्ट्र आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com