esakal | साकीनाका बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

Sakinaka Rape Case : मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार (Sakinaka rape case) होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. या प्रकरणी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो  आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी दिली आहे.

फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

हेही वाचा: Sakianaka rape case : बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

साकीनाका बलात्कार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. "साकीनाक्यातील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी समजली. मुंबई पोलीस आरोपींना पकडण्यात अपयशी ठरलेत. फक्त एका आरोपीला अटक झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत तपासात प्रगती झाली नाही, तर मी चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम पाठवेन. पीडित महिलेच्या कुटुंबलाही आम्ही मदत करु" असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाला कायद्याने तसे अधिकार दिले आहेत.

हेही वाचा: Sakinaka rape case: 'भय इथले संपत नाही…', चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

अखेर तिची झुंज अपयशी

मुंबईत महिलांच्या सुरक्षेवर (women security) गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे. साकीनाका येथे एका महिलेवर अत्यंत अमानुष पद्धतीने बलात्कार (sakinaka rape case) करण्यात आला. रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये ही भीषण घटना घडली. या बलात्कार पीडित महिलेचा आज (ता.१२) दुपारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने मुंबईला हादरवून सोडले आहे. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या मुद्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. नराधम आरोपीने बलात्काराच्या बरोबरीने महिलेला रॉडने जखमी केले. आरोपीच्या अत्याचारामध्ये जखमी झालेल्या महिलेची स्थिती गंभीर होती. अखेर आज दुपारी मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली.

loading image
go to top