मुंबईत कोरोना रुग्णांसाठी जम्बो सुविधा; तब्बल 'इतक्या' खाटांचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण...

mulund ccc
mulund ccc

मुंबई : राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईत कोरोनाचा रुग्णांच्या उपचारासाठी राज्य सरकार, महापालिकेसह अन्य प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याने मुंबईत ठिकठिकाणी तात्पुरत्या कोव्हिड केअर सेंटरची निर्मिती करण्यात येत आहे. सुरुवातीला बीकेसीच्या एमएमआरडीए मैदान, वरळी डोम आदी ठिकाणी सुविधा उपलब्ध केल्यानंतर आज मुंबईत सिडकोच्या साह्याने मुलुंड येथे, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहीसर येथे, नमन समूहातर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून महालक्ष्मी रेसकोर्स येथे आणि बीकेसी येथील 120 खाटांचे आयसीयू अशा 3,520 बेड्सच्या जम्बो सुविधांचा लोकार्पण सोहळा आज (ता.7) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.
 
मालगाडी ठरली मसीहा; लॉकडाऊनमध्येही रेल्वेने अनेक रुग्णांपर्यंत पोहोचविले औषध...   

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे. ऑक्सिजन तसेच आयसीयू देखील उभारले आहेत. ही सुविधा तात्पुरती असली तरी आता पुढचं पाऊल म्हणून मुंबई आणि परिसरासाठी सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरुपी रुग्णालय तयार करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम मोकळ्या मैदानावरील रुग्णालये ही संकल्पना आणली. त्यातही अशी मोकळ्या जागेवरील रुग्णालयांमध्ये आयसीयु सुरू करण्याची विक्रमी कामगिरी महाराष्ट्राने देशासमोर ठेवली आहे. या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यांचा दर्जा राखला गेला आहे. त्याची उभारणीही एखाद्या कायमस्वरुपी रुग्णालयाइतकीच भक्कमपणे झाली आहे. या सोयी अवाक करणाऱ्या आहेत असेही, मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोना उपचारासाठी जंबो सुविधांचा आदर्श महाराष्ट्राने देशापुढे उभा केला आहे. त्यामध्ये देशातील पहिले राज्य असून जेथे 60 टक्के ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, आयसीयू खाटा आहेत. या सोयी सुविधांमध्ये रोबोटेक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुग्णांच्या उपचारासोबत डॉक्टर सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जात आहे. या जम्बो उपचार सुविधांच्या माध्यमातून लोकांना जीवनदान देतानाच जगाला दिशा देण्याचे कामही केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुलुंड, बीकेसी येथील कोरोना रुग्णालयातील आयसीयू सुविधा कार्यान्वित झाली असून उद्यापासून (ता.७) तेथे रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे. याठिकाणच्या आयसीयू विभागात रुग्णांवर उपचार, देखभालीसाठी खासगी विशेषज्ञ, डॉक्टर्स, कर्मचारी यांची सेवा घेण्यात घेण्यात येणार आहे, हा देशातील हा पहिला प्रयोग असल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले. 

दहिसर येथे मुंबई मेट्रोच्या सहकार्याने 955 खाटांचे रुग्णालय उभारले असून त्याठिकाणी 108 खाटांचे आयसीयू उभारण्यात आले आहे.  या केंद्रात 665 ऑक्सिजनेटेड खाटा उपलब्ध असून या ठिकाणी हाय डिपेण्डन्सी युनिट (एचडीयू) तसेच डायलिसिसची सुविधा असणारा अतिदक्षता विभागही असेल. यासाठी 110 खाटा राखीव ठेवण्यात आले आहेत. तर या रुग्णालयातील 200 खाटा मीरा-भाईंदर महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आले. नमन समूहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्सवर 600 खाटांची क्षमता असलेले कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.  मुलुंड येथे सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या 1650 खाटांच्या कोरोना रुग्णालयात 1000 खाटा ऑक्सिजन सोयींयुक्त असून 650 खाटा विलगीकरणासाठी आहेत. याठिकाणच्या 500 खाटा ठाणे महापालिकेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com