बॉलीवूडवर शोककळा; चित्रपट निर्माते हरीश शहा यांचे निधन...

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 7 July 2020

हरीश शहा आणि विनोद शहा हे दोघे भाऊ. त्यांनी एकत्रित मिळून चित्रपटांची निर्मिती केली. राजेश खन्ना, तनुजा, फिरोज खान, मुमताज, धर्मेंद्र, ऋषी कपूर, नीतू सिंग, शत्रुघ्न सिन्हा, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल यांसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केले होते.

मुंबई : 'दिल और मोहब्बत', 'मेरे जीवन साथी', 'काला सोना', 'धन दौलत', 'राम तेरे कितने नाम', 'होटल', 'जाल –द ट्रॅप' यांसारख्या हिंदी चित्रपटांची निर्मिती करणारे ज्येष्ठ निर्माते हरीश शहा यांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते ७६ वर्षांचे होते. अंधेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

'नेमेचि येतो पावसाळा, तोचि...'; पालिकेकडे दाखल झाल्या खड्ड्याच्या 'इतक्या' तक्रारी...

हरीश शहा आणि विनोद शहा हे दोघे भाऊ. त्यांनी एकत्रित मिळून चित्रपटांची निर्मिती केली. राजेश खन्ना, तनुजा, फिरोज खान, मुमताज, धर्मेंद्र, ऋषी कपूर, नीतू सिंग, शत्रुघ्न सिन्हा, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल यांसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केले होते. 'जलजला' या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. सन 2003 मध्ये आलेला सनी देवोलचा 'जाल-द ट्रॅप' हा त्यांचा निर्मिती असलेला शेवटचा चित्रपट होता.

अंगावर काटा आणणारी बातमी ! मुलांवर बारीक लक्ष ठेवा, नाहीतर १२ वर्षीय सुमितसारखं व्हायला वेळ लागत नाही...

गेली दहा वर्षे ते कर्करोगाचा सामना करीत होते. अखेर आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला आणखीन एक धक्का बसला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात हिंदीने अनेक कलाकार गमावले आहेत.  

मुंबईकरांनो! गणपतीला गावी जायचंय... मग त्याआधी गावकऱ्यांचे नियम जाणून घ्या...

हरीश चित्रपटांपासून दूर झाले होते; पण आपला जास्तीत जास्त वेळ ते सोशल मीडियावर घालवत होते. ट्विटरवर ते कायम आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलचे विचार आणि माहिती शेअर करत असे. कर्करोगाशी झुंज देत असतानाचे स्वतःचे छायाचित्र त्यांनी 'व्हॉय मी' या पोस्टरवर शेअर केले होते  सुमारे चार दशकं ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. कर्करोगाशी लढा देत असताना त्यांनी या आजाराशी झगडत असलेल्या लोकांची कहाणी जगासमोर आणण्यासाठी 'व्हाय मी' हा लघुपट बनवला होता. या लघुपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood film producer harish shaha passed away at mumbai