मालगाडी ठरली मसीहा; लॉकडाऊनमध्येही रेल्वेने अनेक रुग्णांपर्यंत पोहोचविले औषध...   

rail gadi
rail gadi

मुंबई : लॉकडाऊन काळात प्रवासी सुविधा बंद असल्याने मध्य रेल्वेने आजारी रूग्णांसाठी घरपोच औषधींचा पुरवठा केला आहे. कर्करोगांशी लढा देणाऱ्यांना नियमित औषधांची आवश्यकता असते. मात्र, लॉकडाऊन असल्याने महागडे आणि मुंबईसारख्या ठिकाणीच मिळणाऱ्या औषधांची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी ट्विटरच्या साह्याने रेल्वेकडे केली. मध्य रेल्वे मालवाहतूकीच्या मदतीने 8 रुग्णांना आतापर्यंत औषधींचा पुरवठा घरपोच करण्याची कामगिरी यशस्वी पार पाडली आहे. 

मध्य रेल्वेने कोरोना महामारीच्या काळात जलदगतीने औषधे पोहोचवून देशभरात 8 हून अधिक कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा दिला असून, कर्करोगी रुग्णांचा रक्षणकर्ता ठरला आहे. नुकतेच बेळगाव येथे रक्ताचा कर्करोग असलेल्या रूग्णांसाठी रेल्वेच्या चार वेगवेगळ्या टप्प्यातून  मुंबईतून औषधे पोहचविण्यात आले.

लॉकडाऊनमुळे अनेक रूग्ण त्यांच्या घरी अडकून पडले आणि कर्करोगाच्या रूग्णांना अत्यावश्यक औषधांची अत्यंत गरज होती. अलीकडेच बेळगाव येथील कर्करोगाच्या दोन रुग्णांना तातडीने मुंबईहून औषधांची आवश्यकता होती. मुंबई ते सोलापूर येथे 24 तासांत औषधे यशस्वीपणे  पाठविल्यानंतर मुंबईहून बेळगावकडे जाणारी थेट ट्रेन नसतांनाही रेल्वे वाहतुकीच्या विविध टप्प्याने औषधे पोहोचविण्याची योजना आखली होती.

त्यानुसार पार्सल बुकिंगने दोन रूग्णांकरिता कर्करोगाची औषधे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन ते पुणे येथे विशेष पार्सल ट्रेनने तर पुण्याहून साताऱ्याला कामगारांसाठी असलेल्या विशेष गाडीने गार्डच्या डब्यातून नेण्यात आली होती. तिसऱ्या टप्प्यात श्रमिक विशेष गाडीच्या गार्डच्या डब्यातून सातारा येथून मिरजला आणि त्यानंतर चौथ्या टप्प्यात मिरज ते बेळगाव मालवाहतुकीने गार्डसच्या डब्यातून हे औषधी घरपोच पोहोचविण्यात यश आले आहे.

'नेमेचि येतो पावसाळा, तोचि...'; पालिकेकडे दाखल झाल्या खड्ड्याच्या 'इतक्या' तक्रारी...

बेळगावात पोहचले औषध
औषधीच्या वाहतुकीचे संपूर्ण समन्वय मुंबई विभाग पार्सल निरीक्षकांनी केले होते. शेवटी दोन रूग्णांसाठीचे औषध पाकिटे मध्यरात्री एक वाजता बेळगाव येथील स्टेशन मॅनेजर यांच्याकडे देण्यात आले.  मध्यरात्री स्टेशन मॅनेजरकडून सर्व औपचारिकता पूर्ण केल्यावर एक औषध रक्ताचे कर्करोग असलेल्या 69 वर्षे वयाच्या प्रकाश माने यांना तर जी एअरफोर्समध्ये सेवा देणाऱ्या कपोल रवी यांच्या 47 वर्षांच्या आईला देण्यात आले.
 

माझ्या वडिलांना या रक्ताच्या कर्करोगाच्या औषधाची तीव्र गरज असताना भारतीय रेल्वेने जी सेवा दिली आहे, त्याबद्दल मी शब्दात वर्णन करू शकत नाही. मी भारतीय रेल्वेचा आभारी आहे आणि त्यांनी अशीच सेवा पुढे द्यावी आणि अधिकाधिक जीव वाचवावेत.
- श्रीधर माने, कर्करोगाच्या रुग्णाचा मुलगा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com