सिंधुताईंची 'ती' इच्छा होणार पुर्ण; CM ठाकरेंनी घेतली दखल

सिंधुताई सपकाळ यांनी अनेकदा या गोष्टीची खंत व्यक्त केली होती.
Sindhutai sapkal
Sindhutai sapkalSakal

ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माय, प्रेमाची साय असलेल्या, सर्व सामान्यांची ताई असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं मंगळवारी चार जानेवारी 2022 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रासह अवघा देश शोकसागरात बुडाला. राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री, कलाकार सर्व सामान्य जनता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांना श्रध्दांजली वाहून शोक व्यक्त केला.

Sindhutai sapkal
"स्टोन आर्ट" मधून सिंधुताई सकपाळ यांना आदरांजली

सिंधुताई सपकाळ राज्यासह देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावून लोकांशी संवाद साधायच्या. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांत बोलत असताना त्यांनी एक खंत अनेकदा व्यक्त केली होती. कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात सिंधूताई यांच्यावर आधारित एक धडा आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही ही खंत एका व्हिडिओमध्ये सिंधुताईंनी व्यक्त केली होती. ती क्लिप आता सर्वत्र व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात मोठ व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठा होतो तो महाराष्ट्र आहे असं मत या व्हिडिओमध्ये व्यक्त केलं आहे. मेल्यानंतर जिथं माणसं मोठी होतात तो महाराष्ट्र आहे हे दु:ख त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीची दखल घेतली असून, तसे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.

Sindhutai sapkal
'मी सिंधुताई सपकाळ' चित्रपटाच्या दिग्दर्शकानं विशेष शब्दांत वाहिली आदरांजली

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल घेण्याची सुचना शालेय शिक्षण विभागाला केली आहे व तसे एक पत्र शालेय शिक्षण विभागांच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठवले आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या समाज कार्याचे आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे धडे लवकरच शालेय अभ्यासक्रमात पहायला मिळतील असा आशावाद शिक्षकवर्गाकडून व्यक्त केला जातोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com