'मी सिंधुताई सपकाळ' चित्रपटाच्या दिग्दर्शकानं विशेष शब्दांत वाहिली आदरांजली

ट्विटद्वारे केल्या भावना व्यक्त
Anant Mahadevan_Sindhutal Sapkal
Anant Mahadevan_Sindhutal Sapkal

मुंबई : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) ऊर्फ माई यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट 'मी सिंधुताई सपकाळ'चे दिग्दर्शक अनंत महादेवन (Anant Mahadevan) यांनी विशेष उल्लेख करत माईंना श्रद्धांजली वाहिली. "फ्लॉरेन्स नाईटिंगेलला माझं शेवटचं विनम्र अभिवाद" अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Unique last respect from the director Anant Mahadevn of Mi Sindhutai Sapkaal)

"फ्लॉरेन्स नाइटिंगेलला माझा शेवटचं विनम्र अभिवादन! ज्यांनी अनेकांच्या जीवनाला स्पर्श केला आणि त्यांचं जीवनंच बदलून टाकलं. सिंधुताईंच्या जाण्यानं मला मनापासून दु:ख झालं. आमच्या आयुष्यात बदल घडवून आणल्याबद्दल धन्यवाद माई! पद्मश्री सिंधुताई सपकाळ" अशा शब्दांत ट्विटरवरुन दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (फ्लॉरेन्स नाइटिंगेल ही इतिहासातील एक इंग्लिश महिला होती जिनं क्रिमियन युद्धादरम्यान (1820-1910) नर्स म्हणून काम पाहिलं. या युद्धकाळात त्यांनी लहान मुलांची आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेतली होती. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना 'लेडी विथ द लॅम्प' असंही संबोधलं जातं. याच अर्थानं सिंधुताईंच्या कार्याचा अनंत महादेवन यांनी गौरव केला आहे)

Anant Mahadevan_Sindhutal Sapkal
मुख्यमंत्री, शरद पवार यांच्यासह अनेकांनी सिंधूताईंना वाहिली श्रद्धांजली

सिंधुताईंचा स्वतःचा खडतर जीवनप्रवास आणि त्यांनी अनाथांना दिलेला आधार, त्यांच्या जीवनात फुलवलेलं नवचैतन्य यानं प्रेरित होऊन ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी सिंधुताईंचा बायोपिक बनवण्याचा निर्णय सन २०१० मध्ये घेतला. मराठी चित्रपटश्रृष्टीतील आघाडीची नायिका तेजस्वीनी पंडीत हीला सिंधुताईंच्या प्रमुख भूमिकेत घेऊन त्यांनी 'मी सिंधुताई सपकाळ' या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. यामध्ये अभिनेते उपेंद्र लिमये यांनी माईंच्या पतीची भूमिका साकालली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून सिंधुताईंचा जीवनप्रवास पहिल्यांदाच लोकांपुढे आल्यानं या चित्रपटाचं समीक्षकांसह प्रेक्षकांनीही कौतुक केलं होतं.

Anant Mahadevan_Sindhutal Sapkal
सिंधुताईंचं जाणं माझ्यासाठी खूप धक्कादायक-तेजस्विनी पंडित

दरम्यान, अनाथांची माय असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी (ता.४) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्यानं पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या अचानक जाण्यानं अनेकांनी आधार गमावल्याची भावना व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com