PM मोदींच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार गैरहजर?

Uddhav Thackeray Not Present in PM Modi Corona Review Meeting
Uddhav Thackeray Not Present in PM Modi Corona Review Meetinge sakal

मुंबई : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा (India Corona Cases) हा चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक (PM Modi Corona Review Meeting) घेणार आहेत. त्यामध्ये राज्यांना काही नव्या सूचना देण्याची शक्यता आहे. पण, या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Uddhav Thackeray Not Present in PM Modi Corona Review Meeting
'शरद पवार पंतप्रधान कधी होणार?' संजय राऊत म्हणतात, 'हिमालयाची...'

मुख्यमंत्र्यांऐवजी कोणाची उपस्थिती? -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मिळतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. पण, पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्री का उपस्थित राहणार नाहीत? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

रुग्ण जास्त असलेल्या राज्यांसाठी नव्या सूचना? -

देशात बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी नव्या रुग्णांची संख्या तब्बल २७ टक्क्यांनी वाढली आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ४७ हजार ४१७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ८४ हजार ८२५ जण कोरोमुक्त झाले. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ११ लाख १७ हजार ५३१ इतकी आहे. तसेच ओमिक्रॉनमुळे ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तरीही रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यासोबतच देशाची चिंता देखील वाढली आहे. महाराष्ट्रासोबतच दिल्लीत देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच पश्चिम बंगालमधील पॉझिटिव्हीटी रेट अधिक आहे. त्यामुळे या तीन राज्यांना पंतप्रधान मोदी काही नवीन सूचना देतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com